पाकिस्तानमध्ये सॅमसंग कंपनीवर ईशनिंदेचा आरोप, 27 कर्मचारी ताब्यात
पाकिस्तानच्या (Pakistan) कराची (Karachi) येथे स्टार सिटी मॉलमध्ये में सॅमसंग कंपनीच्या (Samsung Company) कर्मचार्यांवर ईशनिंदेचा आरोप झाल्यानंतर जमावाने गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
Ruckus in Pakistan: पाकिस्तानच्या (Pakistan) कराची (Karachi) येथे स्टार सिटी मॉलमध्ये (Star City Mall) में सॅमसंग कंपनीच्या (Samsung Company) कर्मचार्यांवर ईशनिंदेचा आरोप झाल्यानंतर जमावाने गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या 27 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कराचीच्या स्टार सिटी मॉलमध्ये वायफाय डिव्हाईस (Wifi Device) बसवण्यात आला होता, ज्याद्वारे कथितपणे ईशनिंदा करण्यात आली, असा आरोप आहे.
डॉन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कराची पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य समजून सर्व वाय-फाय बंद केले आहेत. यासोबतच पोलिसांनी ज्या उपकरणातून ईशनिंदा केली होती, तेही जप्त केले आहे. सॅमसंग कंपनीने या प्रकरणावर माफी मागितली असून कंपनीने धार्मिक बाबींवर तटस्थता ठेवल्याचे म्हटले आहे.
QR कोड आणि निंदा
जमलेल्या जमावाने मोबाईल कंपनीच्या बिलबोर्डवरील QR कोडवर आक्षेप घेतला होता. जो त्यांना ईशनिंदा करणारा आणि अपमान करणारा वाटत होता. या क्यूआर कोडमुळे संतप्त झालेल्या जमावाने जाळपोळ केल्यानंतर घोषणाबाजी केली. या प्रकरणावरून सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात आहे.
सायबर गुन्हे शाखा तपास करत आहे
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण प्रकरणावर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सायबर क्राईम विंगसोबत काम करत आहे. जेणेकरून हे उपकरण बसवण्यासाठी कोण जबाबदार आहे, हे कळू शकेल. याप्रकरणी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये ईशनिंदा हा अत्यंत संवेदनशील मुद्दा मानला जातो आणि अशा आरोपींना कट्टरपंथी गटांकडून लक्ष्य केलं जात. येथे ईशनिंदाबाबत कडक कायदे आहेत. गेल्या वर्षी एका कारखान्यातील कामगाराने श्रीलंकन कामगाराला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
Pakistan Power Crisis : पाकिस्तानमध्ये वीज संकट; इंटरनेट होऊ शकतं बंद, टेलिकॉम ऑपरेटर्सचा इशारा
Right To Abortion : अमेरिकेच्या नव्या निर्णयानंतर गुगलचं मोठ पाऊल, गर्भपात क्लिनिकला भेट देणाऱ्या व्यक्तीची ‘लोकेशन हिस्ट्री’ गुगल हटवणार!