मुस्लिम देशात पहिले हिंदू मंदिर, मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन; पाहा मंदिराची पहिली झलक
UAE Hindu Temple : येत्या 14 फेब्रुवारी रोजी या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने जोरदार तयारी या ठिकाणी सुरू असल्याची काही दृश्य 'एबीपी माझा'च्या हाती आली आहेत.
UAE Hindu Temple : पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिरातील (UAE) अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराच (Hindu Temple) उद्घाटन येत्या 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अबुधाबी येथील या मंदिरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेने संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधल आहे. अबुधाबी येथून 40 किलोमीटर, तर दुबई येथून 105 किलोमीटरवर हे मंदिर आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने जोरदार तयारी या ठिकाणी सुरू असल्याची काही दृश्य 'एबीपी माझा'च्या हाती आली आहेत.
मंदिराचे ठळक वैशिष्ट्ये...
- 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी युएइला गेले असता, तेथील राजाने नरेंद्र मोदी यांना 27 एकर जागा मंदिरासाठी भेट म्हणून दिली होती.
- स्वामीनारायण संस्थेच्या प्रमुख स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार अबुधाबी येथील वाळवंटात हे मंदिर बांधण्यात आलं आहे.
- पश्चिम आशियातील मुस्लिम देशात सर्वात मोठे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्वामीनारायण संस्थेने घेतली.
- सातशे कोटी रुपये खर्च करून 27 एकर जागेवर हे मंदिर बांधण्यात आलं.
- या मंदिराला सात कळस असून संयुक्त राष्ट्र अमिरातील सात राज्याचं हे प्रतिनिधित्व करतात.
- या सात मंदिराच्या समूहात आपल्या देशातील विविध देवी देवतांचे मूर्ती बसवण्यात आले आहेत.
- मंदिराचे बांधकाम हे भारतीय शिल्पकलेनुसार आहे त्यामुळे कुठल्या मुस्लिम देशात इतकं मोठं हे पहिलं मंदिर आहे.
- मंदिराचे बांधकाम हे अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बांधकामाच्या धर्तीवर करण्यात आले असून, त्यामुळे या मंदिराला पुढील एक हजार वर्षापर्यंत कुठलेही नुकसान होणार नाही.
- पश्चिम आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून, कुठल्याही मुस्लिम देशात हे भारतीय शैलीतील हे पहिलं मोठ मंदिर आहे.
- आता येत्या 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होणार आहे व सामान्य भाविकांसाठी हे मंदिर खुलं होणार आहे.
42 देशांचे प्रतिनिधी मंदिराला भेट देणार
दरम्यान, भारतीय राजदूत संजय सुधीर यांच्या निमंत्रणावरून 42 देशांचे प्रतिनिधी अबुधाबी येथील हिंदू मंदिराला भेट देणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 60 हून अधिक विदेशी पाहुण्यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली आहे. मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये अमेरिका, अर्जेंटिना, आर्मेनिया, बहरीन, बांगलादेश, जर्मनी, घाना, आयर्लंड, इस्रायल, इटली, कॅनडा, चाड, चिली, सायप्रस, चेक रिपब्लिक, डोमिनिकन रिपब्लिक, इजिप्त, युरोपियन युनियन, फिजी या देशांचे राजदूत होते.
इतर महत्वाच्या बातम्या: