एक्स्प्लोर
अफगाणिस्तानात टीव्ही चॅनेलवर दहशतवादी हल्ला
अफगाणिस्तानात एका खासगी टीव्ही चॅनेलवर दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला असून, यात चॅनेलमधील कर्मचाऱ्यांसह एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे.
काबुल : अफगाणिस्तानात एका खासगी टीव्ही चॅनेलवर दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला असून, यात चॅनेलमधील कर्मचाऱ्यांसह एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तानातील शमशाद टीव्हीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर तत्काळ चॅनेल ऑफ एअर झालं. हा हल्ला तालिबानी दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचं बोललं जात आहे.
प्रत्यक्षदर्शी रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी चॅनेलच्या परिसरात अंदाधुंद गोळीबार करत, ग्रेनेड फेकले, आणि चॅनेलच्या बिल्डिंगमध्ये घुसले. यावेळी चॅनेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. चॅनेलमध्ये त्यावेळी 100 कर्मचारी होते.
या हल्ल्यानंतर चॅनेलमध्ये मोठी धावपळ सुरु झाली. अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक जाणांना आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान, अफगाणिस्तानात पत्रकार आणि मीडिया कर्मचाऱ्यांवरील हा काही पहिला हल्ला नाही. गेल्या वर्षीच अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या खासगी टीव्ही चॅनेल टोलोवर सात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement