एक्स्प्लोर
इंडोनेशियात 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, 82 जणांचा मृत्यू
लोम्बोक बेटाच्या उत्तर भागात जमिनीच्या 10.5 किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की याची धग अगदी जकार्ता बेटांपर्यंत जाणवली.

इंडोनेशिया : आठवडाभरातच इंडोनेशियामध्ये पुन्हा भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. इंडोनेशियातील लोम्बोक बेटावर 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यात अनेक स्थानिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लोम्बोक बेटाच्या उत्तर भागात जमिनीच्या 10.5 किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की याची धग अगदी जकार्ता बेटांपर्यंत जाणवली. भूकंपानंतरही परिसरात जवळपास 24 ते 25 सौम्य धक्के बसून या भूकंपाचे आफ्टर इफेक्ट्स जाणवले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनंतर इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामी येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या भूकंपाचा सर्वाधिक फटका लोम्बोक शहराला बसला आहे. गिली बेटावर अडकलेल्या जवळपास हजार पर्यटकांची सुखरूप सुटका झाल्याचं इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं सांगितलंय. मागील आठवड्यात इंडोनेशियात याच लोम्बोक बेटाजवळ भूकंप झाला होता. यात 12 पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमावले लागले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
पुणे























