एक्स्प्लोर
VIDEO: तीन वर्षांचा चिमुकला गोरिलासमोर पडला आणि...
ओहाओ (अमेरिका) : अमेरिकेतील ओहाओ प्राणी संग्रहालयात सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकविणारी घटना घडली. एक तीन वर्षांचा मुलगा चक्क गोरिलासमोर पडला. प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी देखील केवळ पाहण्यापलीकडं काहीही करु शकत नव्हते, असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुलगा गोरिलासमोर तब्बल 35 मिनिटे तसाच बसून होता. गोरिलाने काही वेळाने मुलाला आपल्या हाताने उचलल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्राणी सग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना शेवटी मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं.
असा वाचला मुलगा!
मुलाला वाचवण्यासाठी प्राणी संग्रहालयाच्या वतीने अनेक प्रयत्न करुनही अपयश येत होतं. शेवटी गोरिला भडकण्याचीही भिती होती. त्यामुळे गोरिलाला चक्क ठार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोरिलाला ठार करुन मुलाला बाहेर काढण्यात आलं.
दरम्यान, गोरिला शांतपणे मुलाशी खेळत असतानाही त्याला मारल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पण गोरिलाला त्वरित बेशुद्ध करणं शक्य नाही, बेशुद्धीची गोळी मारल्यानंतर त्याला बेशुद्ध होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागतो. त्यामुळे एवढ्या वेळेत गोरिला चिडून मुलाला मारण्याचीही भीती होती. त्यामुळे ठार मारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, असं प्राणी संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आलं.
पाहा व्हिडीओः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement