एक्स्प्लोर
26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त हाफिज सईद PoK ला जाणार
नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर हाफिज सईद आता 26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदविषयी भारतीय गुप्तचर यंत्रणांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर हाफिज सईद आता 26/11 च्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयच्या सूचनेनुसार हाफिज सईद हा दौरा करणार असल्याचीही माहिती आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले होते.
दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प आणि लाँचिंग पॅडचा दौरा
हाफिज सईद पीओकेमध्ये लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे एलओसी जवळ तयार करण्यात आलेल्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प आणि लाँचिंग पॅडचा दौरा करणार आहे. मुंबई 26/11 हल्ल्याला नऊ वर्ष पूर्ण होण्याअगोदर हाफिज सईदची सुटका करण्यात आली आहे. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता.
हाफिज सईद कोण आहे?
हाफिज सईद जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची स्थापनाही त्यानेच केली आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यातही त्याचा होत होता. शिवाय तो मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. हाफिज सईद भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.
एप्रिल 2012 मध्ये, अमेरिकेने दहशतवादासाठी जबाबदार असलेल्यांची यादी जारी केली. या यादीत हाफिज सईदचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. अमेरिकेने हाफिज सईदला पकडून देण्यासाठी एक कोटी डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं आहे. तर भारताने त्याच्या विरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही जमात-उद-दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement