धक्कादायक! सांताक्लॉज आला, कोरोना देऊन गेला
सहसा ख्रिसमसच्या दृष्टीनं येणारा सांताक्लॉज (Santaclause) आनंद, उत्साहाची उधळण करत येतो. बेल्जियममध्येही तो याच उद्देशानं आला खरा. पण, जाता जाता तो इथं कोरोनाचा प्रसार करुन गेला
बेल्जियम : कोरोना व्हायरसचं संकट असतानाच सर्वत्र सण उत्सवांमध्येही याचं सावट पाहायला मिळालं. त्यातच अनेक ठिकाणी यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनलाही आटोपतं घेण्यात आलं. पण, असं असताना कोरोनाच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याकडे अनेकांनीच दुर्लक्ष केलं आणि याची शिक्षाही त्यांना मिळाली.
सध्या सोशल मीडियापासून सगळीकडे अशीच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बेल्जियममधील एका ख्रिसमस सेलिब्रेशन आणि सांताक्लॉजची. सहसा ख्रिसमसच्या दृष्टीनं येणारा सांताक्लॉज (Santaclause) आनंद, उत्साहाची उधळण करत येतो. बेल्जियममध्येही तो याच उद्देशानं आला खरा. पण, जाता जाता तो इथं कोरोनाचा प्रसार करुन गेला.
बेल्जियममध्ये सांताक्लॉजचं गिफ्ट खऱ्या अर्थान महागात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिथं अनावधानानं सांताक्लॉज झालेल्या व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन करताना येत असूनही अनेकदा या नियमांची पायमल्ली होताना दिसते. यानंतर काय होतं याचीच प्रचिती बेल्जियममध्ये आली. जिथं मागील आठवड्यात एका होम केअर सेंटरमध्ये ही घटना घडल्याची बाब समोर आली. (Christmas 2020) ख्रिसमस पार्टीनंतर इथं असणाऱ्या अनेकांनाच कोरोनाची लक्षणं दिसून आली आणि त्यांच्या चाचणीचे अहवालही पॉझिटीव्ह आले.
लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की इथं आनंद पसरवण्यासाठी आलेल्या सांताक्लॉजला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आणि आनंदाऐवजी कोरोनाचाच प्रसार झाल्यामुळं एकच खळबळ माजली. सांताक्लॉज कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं लक्षात येताच होम केअर सेंटरमधील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 157 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यात 36 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आजमितीस या संसर्गामुळं इथं 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
जाणून घ्या कोणत्या राष्ट्रांमध्ये पसरलीये Coronavirus च्या नव्या प्रकाराची दहशत
बेल्जियनममधील या भागातील स्थानिक महापौरांच्या माहितीनुसार इथं कोरोनाच्या कोणत्याच नियमांचं पालन करण्यात आलं नव्हतं. पार्टीदरम्यान मास्कचा वापरही करण्यात आला नव्हता, शिवाय सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नव्हतं. त्यामुळंच हे संकट ओढावल्याची माहिती त्यांनी दिली.