एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या 129 भारतीय विद्यार्थ्यांना अटक
अटक झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करुन मदतीची याचना केली आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अमेरिकेतल्या भारतीय दूतावासाकडून हॉटलाईन सुरु करण्यात आली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी बनावट विद्यापीठात प्रवेश घेतल्याच्या आरोपावरुन 130 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये 129 विद्यार्थी हे भारतीय आहेत. ग्रेटर डेट्रॉईट भागात फर्मिंगटन विद्यापीठातून आतापर्यंत 130 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटक झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करुन मदतीची याचना केली आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अमेरिकेतल्या भारतीय दूतावासाकडून हॉटलाईन सुरु करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीने अवैध व्हिजा रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी डेट्रॉईड फार्मिंगटन हिल्स या विद्यापीठाच्या माध्यमातून एक गुप्त ऑपरेशन सुरु केले होते. या ऑपरेशनच्या माध्यमातून 'पे अँड स्टे' रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला. हे रॅकेट एक भारतीय ग्रुप चालवत होता. या रॅकेटमध्ये जवळपास 600 विद्यार्थी अडकले आहेत. भारतीय दुतावासाने यात अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि पालकांना cons3.washington@mea.gov.in. यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. अमेरिकेत राहायला मिळावे यासाठी बनावट विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या 130 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यात बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सदर विद्यापीठ हे बेकायदा आहे याची कुठलीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी अजाणतेपणातून हे कृत्य केले आहे, असे असताना अधिकारी त्रासदायक पद्धतींचा वापर त्यांच्या विरोधात करीत आहेत, असे या मुलांच्या वकिलांनी म्हटले आहे.24X7 Helpline for Indian Students @meaindia @CGI_Atlanta @IndiainChicago @cgihou @IndiainNewYork @CGISFO @harshvshringla @HarshShringla pic.twitter.com/qd2gCqVR0l
— India in USA (@IndianEmbassyUS) February 1, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement