एक्स्प्लोर

Chhatrapati Shivaji Maharaj : मॉरिशसमध्ये शिवछत्रपतींचा जयजयकार , छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण

Mauritius : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशिसच्या मोका येथे अनावरण करण्यात आलंय.

Mauritius Chhatrapati Shivaji Maharaj : अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आलंय. आज मॉरिशस पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ (Pravind Kumar Jugnauth) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनावरण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

मॉरिशसमधील मराठी मंडली फेडरेशनला मोठा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी 44 दशलक्ष मॉरिशियस रुपये अर्थात भारतीय चलनाचे 8 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला. या निर्णयाची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मॉरिशसमधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलंय. मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्यासोबत सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असंही त्यांनी घोषित केले.

अपार उत्साहात आणि संपूर्णपणे मराठी प्रतिबिंब असलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू  (Alan Ganoo) इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला (Nandini Singala) मॉरिशस मराठी मंडली फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद हे प्रामुख्याने उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपारिक पोषाखात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मॉरिशसमध्ये आपल्या शिवरायांचा सोहळा दिमाखदार पद्धतीने पार पडणं ही प्रत्येक माहाराष्ट्राच्या नागरिकासाठी आनंदाची बाब ठरली. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Devendra Fadnavis (@devendra_fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकाराचा भारताबाहेर केलेला हा चौथा कार्यक्रम आहे. यापूर्वी लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे स्मारक, जपानच्या कोयासन विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसंच रशियात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या पुतळ्याचे लोकार्पण त्यांनी केले होते आणि आज हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सादर करण्यात आले. यात गोंधळ, शेतकरी नृत्य, पोवाडा, इत्यादी मराठी प्रकारांचा समावेश होता.

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस अतिशय भावनात्मक दिवस

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस अतिशय भावनात्मक दिवस आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे उभारण्यात आला, याबद्दल मी मॉरिशसच्या पंतप्रधान आणि येथील मराठी समुदायाचा आभारी आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 12 कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. आम्ही अनेक राजे पाहिले पण छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी, शौर्य, साहस अन्य कुणामध्ये नव्हते. म्हणूनच त्यांना 'श्रीमंत योगी' म्हणतात. जलसंवर्धन, समुद्री सामर्थ्य, किल्ले निर्मिती, प्रबंधन, अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील त्यांचे सामर्थ्य आणि चातुर्य आजही तितकेच मार्गदर्शक आहे. या पुतळ्याच्या उदघाटनासाठी 5000 कि.मी. दूर तुम्ही मला निमंत्रित केले आणि हे भाग्य मला लाभले, हे मी माझे पूर्वपुण्‍य समजतो. महाराजांनी आपल्याला 'महाराष्ट्र धर्म' शिकविला. देव-देश आणि धर्मासाठी जगण्याची शपथ वयाच्या 14व्या वर्षी होणारे आमचे हे आदर्श राजे आहेत. भारतीयांच्या मनामनात वीरतेचे बीजारोपण करण्याचे काम महाराजांनी केले. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विविध घोषणांचे मॉरिशसच्या पंतप्रधानांनी यावेळी स्वागत केले आणि त्यांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करणारे मनोगत व्यक्त केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Embed widget