एक्स्प्लोर
धारावीतील कोरोना प्रसारावरचे नियंत्रण कौतुकास्पद: वर्ल्ड बँक
धारावीतील कोरोनावर नियंत्रण हे सामुदायिक प्रयत्न आणि चिकाटीचा परिणाम असल्याचे जागतिक बँकेने तिच्या अहवालात सांगितले आहे. लॉकडाऊनच्या काळात शासकीय अधिकाऱ्यांसोबतच स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांनी गरीबांना मदत केल्याचीही दखल या अहवालाने घेतली आहे.

वॉशिंग्टन: जागतिक बँकेने बुधवारी जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असणाऱ्या मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणल्याबद्दल कौतुक केले. जागतिक बँकेने म्हंटले आहे की हे यश अनेक साधेसाधे उपाय, लोकसहभाग आणि चिकाटीमुळे शक्य झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वसलेली धारावी ही 2.5 स्क्वेअर किलोमीटर प्रदेशाची आणि 6,50,000 लोकसंख्या असलेली झोपडपट्टी आहे.
धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण हा 1 एप्रिल रोजी म्हणजे मुंबईत पहिला रुग्ण सापडल्यानंतर तीन आठवड्याने सापडला होता. या भागात लोक खुली गटारे आणि अरुंद गल्ल्या असलेल्या आणि जीर्ण झालेल्या इमारतीत राहतात.
वॉशिंग्टनस्थित या संस्थेने तिच्या द्वैवार्षिक दारिद्र्य आणि सामायिक समृध्दी अहवालात म्हंटले आहे की मे महिन्याच्या तुलनेत जुलै 2020 पर्यंत कोरोनाच्या रुग्ण संख्येत 20 टक्क्यांनी घट झाली. जागतिक बँकेने असेही म्हंटले आहे की परिणामकारक साधने आणि समाजातील लोकांच्या झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या मदतीने शहरातील अधिकाऱ्यांना या प्रदेशातील कोरोनावर नियंत्रण प्राप्त करणे शक्य झाले.
लॉकडाऊनच्या काळात गरीब कुटुंबाना मदत करण्यासाठी काही अशासकीय संस्था, मंडळे आणि स्वयंसेवकांनी हजारो रेशनींग किटचे वाटप केले.
मंगळवारी मुंबईतील नागरी प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की धारावी झोपडपट्टीतील रुग्ण संख्या 3280 इतकी झाली आहे. यापैकी 2795 लोक बरे झाले असून 192 अॅक्टिव केसेस् आहेत. जूलै महिन्यातही जागतिक आरोग्य संघटनेने धारावीतील कोरोनाच्या नियंत्रणासाठी चाललेल्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या ही नव्या 72,049 रुग्णांसह 67.57 लाख इतकी झाली आहे. तर 57,44,693 लोक या आजारातून बरे झाले आहेत. हा दर 85.02 इतका आहे. तसेच मृतांची संख्य़ा 1,04,555 इतकी झाली आहे.
जॉन हापकिन कोरोनाव्हायरस सेंटरच्या मते जगात 35 दशलक्ष लोकांना कोरोना झाला असुन 1 दशलक्ष लोक मृत्युमूखी पडले आहेत. कोरोनाचा उगम गेल्या डिसेंबरमध्ये चीनमधील वूहान या शहरात झाला आहे. कोरोनाने जगाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असुन इंटरनॅशनल मॉनेटरी फंड या संस्थेच्या मते जागतिक अर्थव्यवस्था ही तीव्र मंदीतून जात आहे.
अमेरिकेत जगातील सर्वात जास्त म्हणजे 7.5 दशलक्ष कोरोनाचे रुग्ण असून मृतांची संख्या ही दोन लाखांवर पोहचली आहे. नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी या वर्षाअखेरीस कोरोनावर लस येईल अशी आशा व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
