Chhatrapati Sambhaji Nagar : विमानात प्रवासी महिलेचा मृत्यू, मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या विमानाचे चिकलठाण्यात इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhaji Nagar: मुंबईहून वाराणसीकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाचे वैद्यकीय इमर्जन्सीमुळे अचानक चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले

छत्रपती संभाजीनगर: मुंबईहून वाराणसीकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाचे वैद्यकीय इमर्जन्सीमुळे अचानक चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातून प्रवास करत असलेल्या जेष्ठ महिला प्रवासी सुशीलादेवी (राहणार मिर्जापुर,उत्तर प्रदेश) यांची तब्येत अचानक बिघडली. यावेळी प्रवाशाची स्थिती बघून पायलेटने तातडीने छत्रपती संभाजीनगरातील विमानतळावर आपातकालीन लँडडिंगसाठी संपर्क साधला. आणि त्यानंतर काल (6 एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आणि काही वेळातच विमान तेथे उतरले.
लँडिंगनंतर वैद्यकीय पथकाने वृद्ध प्रवाशाला तपासले, परंतु तोपर्यंत या ज्येष्ठ महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी पंचनामा केला. पुढील प्रक्रिया पूर्ण करून विमानाने पुन्हा वाराणसीकडे उड्डाणाचे नियोजन केले. मात्र हे मृत्यू नेमकं कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही.
वांद्रे-वरळी सागरीसेतूवर मोटरगाडी दुभाजकाला धडकली, गुजरातचे दोन जणं जखमी
वांद्रे-वरळी सागरीसेतूवर मोटरगाडी दुभाजकाला धडकल्यामुळे शनिवारी रात्री झालेल्या अपघातात गुजरातचे दोन जणं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोटरीचा चालक दारूच्या अंमलाखाली असल्याचे वैद्याकीय तपासणीत निष्पन्न झाले असून, याप्रकरणी त्याच्या विरोधात निष्काळजीपणे मोटरगाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री मोटरगाडीने दुभाजकाला धडक दिली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात चालक हेतूल रामजियाणीसह मोटरगाडीतील इतर दोघे नरेश पोकर व पार्थ लिंबाणी दोघेही जखमी झाले होते. दोघेही गुजरातमधील कच्छ येथील रहिवासीअसून दोघेही रामजियाणी यांच्याकडे आले होते.
दरम्यान, कांदिवली येथील रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. हाजिअली येथे गेल्यानंतर ते सिलिंकवरून घाटकोपरला जात होते. त्यावेळी मोटरगाडी दुभाजकाला धडकली. चालकाची वैद्याकीय तपासणी जे.जे. रुग्णालयात करण्यात आली असून, त्याने मद्याप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याचे वरळी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता, पण पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने तेथील मोटरगाडी हटवली आणि वाहतूक सुरळीत झाली. सध्या वरळी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सिडको येथील पाणीपुरवठा ऑफिस संतप्त महिलांचा घेराव
छत्रपती संभाजीनगर येथील महिलांनी एन-7 आयोध्यानगर सिडको येथील पाणीपुरवठा ऑफिस आणि जे. ई भूषण देवरे यांना घेराव घातला आहे. जायकवाडी धरण जवळ असताना नियोजन शून्य कारभार छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे, दहा दिवसात पाणी होतो. त्यातही कमी दाबाने पाणीपुरवठा चालू आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी पाणीपुरवठा टाकीवर जाऊन पाणी सोडण्याचे साहित्य जप्त केले आहे. जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाच पाणी सोडू देणार नाही, असे संगत संतप्त महिलांनी तेथे ठिय्या दिला आहे.
हे ही वाचा
























