एक्स्प्लोर

Zomato डिलिव्हरी बॉयवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महिलेने सोडलं शहर

बेंगळुरु पोलिसांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या हितेशा चंद्राणी या महिलेविरोधात एफआयआर दाखल केला. एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा संबंधित महिलेने शहर सोडलेल्याचं समोर आलंय.

बेंगळुरु: झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या हितेशा चंद्राणीने बेंगळुरु शहर सोडलं आहे.  एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी हितेशाशी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांना कळाले की तिने शहर सोडलं आहे. 

एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी हितेशा चंद्राणीची चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्यासाठी तिला फोन केला तेव्हा आपण शहर सोडल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. सध्या ती महाराष्ट्रात तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली आहे. सोमवारी, झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराजने हितेशा चंद्राणी विरोधात पोलिसाकडे तक्रार दाखल केली होती. 

पोलिसांच्या मते, हितेशा परत आल्यानंतर तिने या प्रकरणावर आपला जबाब द्यावा, अन्यथा तिला अटक करावी लागेल. 

झोमॅटो डिलिव्हरी बॉयने केला हितेशावर मारहाणीचा आरोप
पोलीस अधिकारी म्हणाले की, झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या आरोपावर हितेशा चंद्राणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलिव्हरी बॉयने आपल्या तक्रारीत असं सांगितलं आहे की, हितेशानेच त्याला चपलांनी मारले होते आणि शिव्या देखील दिल्या होत्या.

झोमॅटोवरुन मागवलेले खाद्यपदार्थ डिलिव्हरी करण्यास वेळ का झाली असा जाब विचारल्यानंतर डिलिव्हरी बॉयने आपल्याला मारहाण करायला सुरुवात केल्याचा आरोप हितेशाने केला होता. दरम्यान, हितेशाने या प्रकरणी जो व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला होता तो आता काढून टाकला आहे.

काय आहे प्रकरण?

हितेशा चंद्रानी हिने  झोमॅटो कंपनीच्या कामराज या डिलिव्हरी बॉयवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या प्रकरणात झोमॅटो कंपनी आणि कर्मचारी कामराजवर देशभरातून टीका केली गेली. नंतर कामराजने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला कसं खोटं पाडलं जातंय आणि कसा बळीचा बकरा केला जातोय याची कथा मांडली होती.त्यानुसार आता मॉडेल आणि मेकअप कलाकार असणाऱ्या हितेशा चंद्रानीवर आयपीसी कलम 355, कलम 504 आणि कलम 506 असे अनुक्रमे हल्ला, अपमान आणि धमकी या गुन्ह्याखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेंगळुरुच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये कामराजने ही तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sharad Pawar: राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची: शरद पवार
राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची: शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule on Devendra Fadnavis : गडकरी चांगले नेते; देवाभाऊ कॉपी करून पास - सुळेSunil Kedar Vs Aashish Jaiswal : जैस्वालांना धडा शिकवण्यासाठी बंडखोरी - केदारABP Majha Headlines :  12 PM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :14 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sharad Pawar: राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची: शरद पवार
राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची: शरद पवार
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Embed widget