वातावरणात बदल! हवामान विभागाचा नवीन अंदाज जारी, तळकोकणातील शेतकरी धास्तावले
Weather Update News : तळकोकणात उद्यापासून पुढील 4 दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे
Weather Update News : सध्या राज्याच्या विविध भागात थंडीचा कडाका सुरु झाला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल (Climate Change) होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तळकोकणात उद्यापासून पुढील 4 दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. 3 आणि 4 डिसेंबरला तळकोकणात पावसाचा यलो अलर्ट (YelloW Alert) हवामान विभागानं जारी केला आहे. मात्र, यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळं शेतकरी मात्र धास्तावलेत. कारण याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाच्या अंदाजामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात बदल झाला आहे. उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना, बं उपसागरातून 'फिंजल' चक्रीवादळाच्या बाह्यपरिघ फेरीतून, एकदम काटकोनातून म्हणजे पूर्वे दिशेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला जात आहे. त्यामुळं दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या बदलणाऱ्या वातावरणामुळं शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान 28 तर पहाटेचे किमान तापमान 12 ते 14 डिग्री सेल्सिअस
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान 28 तर पहाटेचे किमान तापमान 12 ते 14 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरी इतकी अजूनही जाणवतात. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात भाग बदलत ही तापमाने अजुन खालवलेली असुन ती सरासरीच्या 2 ते 4 डिग्रीने घसरलेली आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक तसेच छ.सं.नगर अश्या ५ जिल्ह्यात मात्र ह्या वातावरणाचा थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नसून तेथील थंडी टिकून राहील, अशी शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं. दरम्यान आठवड्याभराच्या कालावधीनंतर, म्हणजे रविवार 8 डिसेंबरनंतर थंडीत पुन्हा वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या विषववृत्तीय आग्नेय बंगालच्या उपसागारात जाणवणारी चक्रीय वाऱ्याची स्थिती आणि त्याचबरोबर फिंजल' चक्रीवादळाचे अरबी समुद्रात प्रवेशणाऱ्या शिल्लक अवशेषाचे विकसन, त्यानंतर घेणारी दिशा, ह्यावरच महाराष्ट्रातील त्यापुढील आठवड्यातील थंडीची स्थिती अवलंबून असेल असे मत माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या: