पंक्चर बनवणाऱ्या पठ्ठ्याची कमाल, फेकलेल्या टायरचा असाही वापर
Wardha Dabir Sheikh : वर्ध्यात पंक्चर दुरूस्तीचं दुकान असलेले दाबिर शेख फेकलेल्या टायरपासून सुंदार कलाकृती तयार करतात. त्यांच्या या कलाकृती प्रचंड व्हायरल झाल्या असून लोक सेल्फी घेण्यासाठी येथे गर्दी करतात.
Wardha's Dabir Sheikh Creates Art from Discarded Tyres : देशासह जगभरात अनेक कलाकार आहेत. अनेक वेळा खेड्यापाड्यातील अशिक्षित कलाकार त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतीमुळे व्हायरल झालेले पाहायला मिळतात. या कलाकारांची कलाकारी शिक्षण घेतलेल्या कलाकारांपेक्षाही वरचढ ठरते. असाच एक पठ्ठ्या महाराष्ट्रातील वर्ध्यामध्ये आहे. हा पठ्ठ्या चक्क फेकलेल्या टायरपासून उत्तम कलाकृती बनवतो. या उत्तम कलाकृती एखाद्या निपुण कलाकारालाही लाजवेल अशा आहेत. आम्ही असं का म्हणतोय याचा अंदाज तुम्हाला या कलाकृती स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यावरच येईल.
महाराष्ट्रातील वर्धा येथील दाबिर शेख यांचं पंक्चर बनवण्याचं दुकान आहे. पंक्चर दुकानात बरेच निकामी झालेले टायर असतात. बहुतेक दुकानदार हे टायर फेकून देतात. पण वर्ध्यातील दाबिर यांनी या टाकाऊ टायरचा उत्तम वापर करण्याची शक्कल लडवली आहे. दाबिर शेख हे या टायरचा वापर करुन वेगवेगळ्या भन्नाट कलाकृती बनवतात. त्यांच्या या कलाकृती इतक्या प्रसिद्ध झाल्या आहेत की, लोक पंक्चर बनवण्याऐवजी अधिक लोक त्यांच्या कलाकृती पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी येतात.
Maharashtra | Wardha's Dabir Sheikh, who owns a puncture repair shop creates art from discarded tyres
— ANI (@ANI) June 12, 2022
"People started liking them so I kept making them. It's also helping in maintaining cleanliness. I've made various designs including dragon, turtle," he said pic.twitter.com/GgpT3P2VL7
दाबिर शेख यांनी वेगवेगळ्या आकाराच्या टायरपासून उत्कृष्ट कलाकृती तयार केल्या आहेत. त्यांच्या कलाकृती पाहणारा प्रत्येक जण त्यांचं तोंड भरून कौतुक करताना थकत नाहीय. दाबिर टाकाऊ टायरपासून कलाकृती बनवतात आणि त्यानंतर दुकाना शेजारी ठेवतात. फ्लायओवरच्या खालील भागात त्यांनी या कलाकृती प्रदर्शनी लावल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या फ्लायओवरच्या खाली आधी जिथे अस्वच्छता असायची तेथे आता लोक अस्वच्छता पसरवल नाहीत, तर सेल्फी घेतात. दाबिर शेख यांची ही आवड आणि उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.
दाबिर शेख यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'मी कलाकृती बनवायला सुरुवात केली आणि लोकांना ते आवडू लागले. म्हणून मी कलाकृती बनवणं सुरुच ठेवलं. त्यामुळे परिसरात स्वच्छता राखण्यातही मदत होत आहे. मी ड्रॅगन, कासवांसह विविध डिझाइन्स बनवल्या आहेत.'