एक्स्प्लोर

Wardha News: कर भरा आणि वर्षभर फुकट दळून न्या, कर वसुलीसाठी मनसावळी ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल

Wardha News : अलीकडे कर भरण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने मनसावळी ग्रामपंचायतीने शंभर टक्के कर भरा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या ! ही संकल्पना सुरू केली आहे. 

वर्धा:  वर्धा जिल्ह्यातल्या (Wardha) ग्रामपंचायतीनं एक अनोखी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीचे (Gram Panchayat)  सर्व कर भरा आणि वर्षभर गिरणीतून मोफत धान्य दळून न्या अशी योजना ग्रामपंचायतीनं राबवली आहे.  ग्रामपंचायतीनं वेगळी योजना राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.

स्वयंपाकासाठी लागणारे पिठ गिरणीतून दळून आणलं जातं. पण हेच दळण गावकऱ्यांना वर्षभर मोफत मिळत असेल तर पर्वणीच म्हणावी लागेल. गावाला नि:शुल्क दळण दळून मिळण्याची ही संधी मनसावळी या वर्धा जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावकऱ्यांना मोफत दळण दळून जर पाहिजे असेल तर मात्र ग्राम पंचायतीला शंभर टक्के कर भरणा करणे अत्यावश्यक आहे. या अटीवरच गावात ग्राम पंचायतने पुढाकार घेऊन उभारलेल्या पीठ चक्कीवर मोफत दळून दिले जात आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी कर रुपात उभा केला जातो. पण अलीकडे कर भरण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने मनसावळी ग्रामपंचायतीने शंभर टक्के कर भरा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या ! ही संकल्पना सुरू केली आहे. 

 ग्रामपंचायतीच्या या संकल्पनेचा गावाला फायदा देखील व्हायला लागला आहे. नागरिक आपले घर आणि पाण्याचा टॅक्स भरून आपली जबाबदारी पूर्ण करू लागले आहे. घर कराची पावती गिरणीवर दाखवायची आणि आपले गहू, ज्वारी, बाजरी, डाळ आदी धान्य दळून न्यायचे, असाच नित्यनियम गावकरी पाळताना दिसत आहे.  ग्रामपंचायतीचे सरपंच प्रांजली मुकेश भोयर यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या प्रयोगाने कर गोळा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 1200 लोकसंख्या असलेल्या मनसावळी या गावात 2021-22 मध्ये 1 लाख 50 हजार इतकी कर वसुली झाली होती. तर 2022-33 मध्ये 1 लाख 90 हजार इतकी कराची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. 

चेंढरे ग्रामपंचायतीत  'स्कॅन करा आणि कर भरा'

 बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतीचा कारभार देखील हायटेक झाला आहे. ग्रामपंचायतीत देखील नवे प्रयोग सध्या राबवले जात आहे.  ग्रामपंचायतीचा कारभार (Gram Panchayat Governance ) पारदर्शक असावा, याकरता रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढवली आहे.   ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी पूर्णपणे ऑनलाईन सुविधा दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी क्यूआर कोड बनविण्यात आले आहे. चेंढरे  ग्रामपंचायत  ऑनलाईन सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रयोगाचे चांगलेच कौतुक होत आहे.  ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी ऑनलाईन भरता येणार आहे. 'क्यूआर -कोड' मुळे आजच्या काळात आर्थिक व्यवहार करणे हे सोपे झाले आहे. अलिबाग येथील चेंढरे ग्रामपंचयतीमध्ये  प्रत्येक घरावर  'क्यूआर कोड' लावण्यात आले आहे. क्यूआर कोड' (QR Code)  स्कॅन करून घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुविधा देणारी   चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget