(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cotton Price News : कापसाचे दर वाढणार कधी? शेतकरी करतायेत दरवाढीची अपेक्षा
Cotton Price News : राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) चिंतेत आहेत. कारण कापसाच्या (Cotton) दरात घसरण झाली आहे.
Cotton Price News : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) चिंतेत आहेत. कारण कापसाच्या (Cotton) दरात घसरण झाली आहे. कापसाच्या दरात कधी सुधारणा होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. दर कमी असल्यामुळं अद्याप शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. कापूस शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे. सध्या कापसाला सात हजार ते आठ हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.
Cotton cultivation : कपाशीची लागवड वाढली
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं वर्धा (Wardha) जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. वर्धा जिल्ह्यात कापसाला सध्या सात ते आठ हजार रुपयांचा दर मिळत आहे. मागील वर्षी हाच दर 11 ते 12 हजार रुपयांच्या दर मिळत होता. मात्र, यावर्षी अद्यापही कापसाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी (Farmers) अद्याप कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवला आहे. मागील वर्षी कापशीला मिळालेल्या बाजारभावामुळं शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची लागवड वाढवली होती. पण अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. अतिवृष्टी आणि कापाशिवरील रोगामुळे कपाशीच्या उत्पादनात घट आली आहे.
मूलभूत गरजांसाठी पैसा अत्यावश्यक
कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही. तर जिनिंग आणि प्रेसिंग युनिटमध्ये देखील कपाशीची आवक वाढली नसल्याचे चित्र आहे. परंतू शेतकऱ्यांना लागलेला मजुरीचा खर्च, घरात असणारे लग्न समारंभ याशिवाय मुलांचे शिक्षण आणि मूलभूत गरजांसाठी पैसा अत्यावश्यक असतानाही कापूस दर कसा वाढेल याचीच प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
अतिवृष्टीचा कपाशीला मोठा फटका
अतिवृष्टीमुळं कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी चार ते पाच क्विंटल असे उत्पादन होण्याची शक्यता आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कपाशीचं उत्पादन घेतलं जाते. मात्र, यावर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका येथील कापसाला बसला आहे. हाती आलेली पीक अतिवृष्टीमुळं वाया गेली आहे. पुन्हा उरली सुरली पीक परतीच्या पावसामुळं वाया गेली आहेत. या फटक्यातून वाचलेल्या पिकांना देखील योग्य तो दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचे दर कधी वाढमार याची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील आवाज उठवला होता. मात्र, अद्याप दरात वाढ झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
Cotton Production : 15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस पाच हजारांवर, 'या' राज्यातील शेतकरी आक्रमक, चक्का जाम आंदोलनाचा इशारा