एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Agriculture News : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, 500 रुपयाला विक्री होणारं कॅरेट आता 50 रुपयांना; बळीराजा चिंतेत

Agriculture News : 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे कॅरेट आता 50 रुपयांना विक्री होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका वर्धा (Wardha) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.

Wardha Agriculture News : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Farmers)  चिंतेत सापडला आहे. कारण मातीमोल दरानं टोमॅटोची विक्री (Tomato Price) होत आहे. एकेकाळी 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे कॅरेट आता 50 रुपयांना विक्री होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका वर्धा (Wardha) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. दरात घसरण झाल्यामुळं टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.    

दर घसरल्यानं टोमॅटो गुरांपुढे टाकण्याची वेळ 

टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारात कवडीमोल दरानं टोमॅटोची विक्री होत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी-मुंगापूर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील टोमॅटो चक्क गुरांपुढे टाकले आहेत. टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे. सततच ढगाळ वातावरण आणि बाजारात टोमॅटोची वाढलेली आवक यामुळं एकेकाळी चारशे ते पाचशे रुपयांना जाणारं टोमॅटोचं कॅरेट आता 50 रुपयांना विकलं जात आहे. 

लागवड ते तोडणीपर्यंतचा खर्च मोठा

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील खापरी येथील शेतकरी पुरुषोत्तम गणपत वैद्य यांना पाच एकर शेती आहे. या शेतीपैकी एक एकरमध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर उतरल्यामुळं पुरुषोत्तम वैद्य यांनी आपल्या शेतातील टोमॅटो जनावरांना खाऊ घातली. पुरुषोत्तम वैद्य यांचा टोमॅटो लागवड ते तोडणीपर्यंत मोठा खर्च झाला आहे. सध्या टोमॅटो विक्रीतून तो खर्च निघणेही कठीण झालं आहे. टमॅटोच्या विक्रीतून मजुरीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत

दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना टोमॅटो फेकूण देण्याची वेळ आली आहे. सध्याच्या दरानं शेतखऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. विदर्भात टोमॅटो सारख्या भाजीवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. जे आहेत ते बोटावर मोजण्याइतके आहेत. समृद्धी महामार्ग झाला आहे. या मार्गाच्या माध्यमातून टोमॅटो मेट्रो शहरपर्यंत पोहोचू शकतात. पण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर दुसरीकडे कोल्ड स्टोरेजची निर्मिती देखील झाली पाहिजे. टोमॅटो सारख्या उत्पादनाला कोल्ड स्टोरेजची नितांत गरज आहे, कारण दर आल्यावर त्याची विक्री करता येईल अशी व्यवस्था हवी आहे. दरम्यान, आधीच अतिवृष्टीमुळं शेतखऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच आता शेतमालाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : कवडीमोल भावामुळे टोमॅटो तोडणी बंद; शेतशिवार लालेलाल, लातूरच्या वडवळ गावातील शेतकरी आर्थिक संकटात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget