Wardha Accident News: कारवरील नियंत्रण सुटलं, भरधाव कारने 3-4 पलट्या घेतल्या; 3 तरुणांचा दुदैवी अंत! एक गंभीर जखमी
Wardha News : नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झालाय. कार भरधाव वेगात रस्त्याच्या खाली उतरल्याने कार तीन चार पलट्या मारत रस्त्याच्या खाली पडली असून यात 3 तरुणांचा दुदैवी अंत झालाय.

Wardha News : नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झालाय. कार भरधाव वेगात रस्त्याच्या खाली उतरल्याने कार तीन चार पलट्या मारत रस्त्याच्या खाली पडलीय. ही घटना पहाटे तुळजापूर - नागपूर मार्गावर सेलू येथे धानोली फाट्यावर घडली आहे. या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून नागपूर येथे उपचाराला नेले जाते असताना तिसऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर यात एक जण जखमी झाला आहे. सर्व राहणारे वर्ध्याच्या सिंदी मेघे येथील असून मृतकांमध्ये सुशील म्हस्के, शुभम कवडू मेश्राम, समीर सुटे यांचा समावेश आहे. तर जखमी युवकाचे नाव धनराज धबर्डे असे आहे.
वाहण्याचा धडकेत रोही ठार
यवतमाळच्या वडकी रोडवर एका चारचाकी वाहनाने रोहीला जबर धडक दिली. या अपघातात रोहिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राळेगाव तालुक्यातील वडकी ते खैरी मार्गावर घडली. ही धडक इतकी भीषण होती की चारचाकी वाहन सुमारे 30 फुट बाजूला फेकल्या गेलंय. या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नसून मात्र वाहनाचा समोरील भाग चकनाचूर झाला. वणी तालुक्यातील कायर बोपापुर येथील नेताजी ढवस,घनश्याम निखाडे व सुभाष पिंगे हे तिघे एम एच 29 ए डी 4298 या क्रमांकाच्या कारने जात असताना हा अपघात झाला.
शटरचे लॉक तोडून बॅटरी चोरी, रेकॉर्डवरील आरोपीला बेड्या
दुसरीकडे नागपूरातुन एक बातमी समोर आली असून यात कुख्यात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दुकानाच्या शटरचे लॉक तोडून बॅटरी चोरी करणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीला यशोधरा नगर पोलिसांनी अटक केलीय. या चोरट्याकडून चोरी केलेल्या दुचाकीसह, 16 बॅटरी जप्त करण्यात आल्याय. उस्मान इकबाल अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपूरच्या यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राणी दुर्गावती चौक येथे एका दुकानाच्या शटरचे लॉक तोडून बॅटरी चोरी गेल्या होत्या. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की गुन्हातील आरोपी दुचाकीने राजीव गांधी चौक येथे येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले.
दरम्यान, आरोपीची विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे. त्याच्या जवळच्या दुचाकीची चौकशी केली असता दुचाकी यशोधरा नगर पोलीस स्टेशनमधून चोरी केलेली होती. पोलिसांनी त्याच्याकडून 16 बॅटरी , एक दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण दोन लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्यावर घरपोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहे. पुढील तपास करत असल्याची माहिती यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
