Walmik Karad : अखेर वाल्मिक कराड शरण! सीआयडीसमोर सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड नेमकं काय म्हणाला?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण आला आहे.
Santosh Deshmukh Case पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. हत्या प्रकरणात संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आलेले वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होते. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते. वाल्मिक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. दरम्यान सीआयडीसमोर सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले वाल्मिक कराड ?
'मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. सरपंच संतोष भैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी आहे, त्यांना अटक करावी. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. केवळ राजकीय द्वेषापोटी या प्रकरणाशी माझे नाव जोडले जात आहे. पोलीस निष्कर्षात मी जर दोषी आढळल्यास न्यायदेवता जे काही शिक्षा देईल ते मी भोगण्यास तयार आहे. अशी प्रतिक्रिया कराड यांनी दिली आहे.
वाल्मिक कराड यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात
वाल्मिक कराड यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात दिसून आले होते. वाल्मिक कराड हे उज्जैन येथील महाकाल मंदिर आणि मध्य प्रदेशातील पेच अभायारण्यात काही काळ मुक्कामाला असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र, आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतात का, हे पाहावे लागेल. सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीपसींग गील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे दाखल. वाल्मीक कराड सीआयडीला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलीसांकडून सी आय डी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा- धनंजय देशमुख
वाल्मीक कराडांबाबत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, ते शरण येणार आहे की त्यांना पकडणार आहेत, तपासाचा भाग आहे. त्यावर आपण काय बोलणार. मनोज जरांगे पाटील हे आमच्या दुःखात सहभागी आहे. जिल्हा सह राज्यातील अठरापगड जाती, समाज, संस्था आणि नागरिक आमच्या सोबत असून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही बाळगून असल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा