एक्स्प्लोर

मोठी बातमी : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सांगली लोकसभा लढणारच!

Vishal Patil : सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ठाम असलेले विशाल पाटील यांनी अखेर आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Sangli Lok Sabha : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) चर्चेत आला आहे. सांगलीची (Sangli) जागा महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडली. मात्र यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

महाविकास आघाडीत ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सांगली मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज 

विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस नेते नागपूरकडे (Nagpur) रवाना झाल्यावर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी दाखल केली. तर उद्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे झाले तर महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या सकाळी सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत दुसरा अर्ज दाखल करणार, अशी देखील माहिती मिळत आहे. 

विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते झाले होते आक्रमक

दरम्यान, काँग्रेसकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे याआधी दिसून आले. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावीम असे पत्र अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने  लिहले होते. तसेच रक्ताने लिहिलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले होते. 

माजी आमदाराने दिला विशाल पाटलांना पाठींबा 

दरम्यान, सांगलीत गेल्या काही दिवसांपासून संजय पाटील यांच्या उमेदवारी विरोधात रोष समोर येत आहे. त्यातच माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे भाजपला सांगलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांची ताकद आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा 

Sangli Lok Sabha: सांगलीत घडामोडींना वेग; काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार, प्रमुख नेते नागपुरला रवाना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
×
Embed widget