एक्स्प्लोर

'भाजपाने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवली, वापर करायचा अन् नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकायचं'; विनायक राऊतांचा टोला

Vinayak Raut : भाजपाच्या नितीचा प्रत्यय नारायण राणेंना आला आहे. जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत वापर करायचा नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.

Vinayak Raut : भाजपाच्या (BJP) नितीचा प्रत्यय नारायण राणेंना (Narayan Rane) आला आहे. जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत वापर करायचा नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचे. भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. दुदैव एवढंच आहे की, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना राज्यसभेची जागा दिली. त्यापेक्षा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला हे दिलं असते तर ते भाजपला शोभले असते, असा टोला खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लगावला आहे. 

ज्या अशोक चव्हाण यांना कंटाळून नारायण राणे दूर गेले. त्यांच्याच सोबत आता नारायण राणेंना काम करावे लागणार आहे. शिंदे गटाची अवस्था वाईट होणार आहे. येत्या काही दिवसात शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार आहेत. कोट्यावधी रुपयांचे आरोप असतात ते भाजपवासी झाले की, ते धुतल्या तांदुळाप्रमाणे होतात. सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) मिळालं पाहिजे, जरांगेच्या जिवाशी सरकार खेळतंय. त्यांची विचारफुस करायला देखील ते जात नाहीत. नारायण राणे जरांगेबद्दल जे बोलले ते अयोग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हा राजकीय छंद बनलाय

आयकर विभागाने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ आणि कुटुंबियांना दिलासा दिला आहे. याबाबत विनायक राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, जे जे भष्ट्राचारी आहेत त्यांनी भाजपच्या लॉन्ड्रीमध्ये जायचं, त्यांना मशिनमध्ये जायचं आहे आणि स्वच्छ होवून यायचे हा राजकीय छंद बनलाय, असे त्यांनी म्हटले आहे. 

भाजपमुळे शिंदे गटाची गोची नाही ढेकूण झालाय

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत विनायक राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष काही वेगळा निर्णय देतील, अशी अपेक्षा नाही. शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच आज होईल. असे त्यांनी म्हटले आहे. भाजपमुळे शिंदे गटाची गोची नाही ढेकूण झालाय, असाही टोला त्यांनी लगावला आहे. 

सरकार बेईमानी करतंय

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालवत आहे.बुधवारी जरांगे यांची तब्येत खालावली त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली, मात्र जरांगेनी सलाईन काढून टाकली. याबाबत विनायक राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, जिवाशी खेळण्याचे क्रुर पाप राज्य सरकार करतंय, एकनाथ शिंदे यांनी फसवलं आणि स्वतःचा टेंभा मिरवला, सरकार बेईमानी करत आहे, असा समाचार त्यांनी घेतला आहे.

आणखी वाचा 

पापापा ते काका का? शरद पवारांना पाडण्याची भाषा, रोहित पवारांनी अजित पवारांना जुना व्हिडीओ दाखवला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget