![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 CSK VS GT : चेन्नईच्या विजयात सहभागी होताना दिसले विकी कौशल अन् सारा अली खान; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला,"बदले तेरे MAHI"
Vicky Kaushal Sara Ali Khan Watch CSK Vs GT Match : 'आयपीएल 2023'चा अंतिम सामना पाहायला सारा अली खान आणि विकी कौशल गेले होते.
![IPL 2023 CSK VS GT : चेन्नईच्या विजयात सहभागी होताना दिसले विकी कौशल अन् सारा अली खान; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, Vicky Kaushal-Sara Ali Khan Watch CSK Vs GT Match IPL 2023 Final Vicky Kaushal Sara Ali Khan Viral Worthy Reaction CSK Win IPL 2023 CSK VS GT : चेन्नईच्या विजयात सहभागी होताना दिसले विकी कौशल अन् सारा अली खान; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/30/0ea76711982d924e77a6c3c906e924001685420635717254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vicky Kaushal Sara Ali Khan Watch CSK Vs GT Match : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. नुकतेच ते आयपीएल 2023'चा अंतिम सामना पाहायला गेले होते. तसेच चेन्नईच्या (CSK) विजयातदेखील ते सहभागी झाले.
विकी कौशल-सारा अली खान चैन्नईच्या विजयात सहभागी!
विकी कौशल आणि सारा अली खानने त्यांच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'आयपीएल 2023'मध्ये हजेरी लावली होती. 'आयपीएल 2023'चा अंतिम सामना खूपच रंगतदार झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सचा पराभव केला. दरम्यान सारा आणि विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही चेन्नईच्या विजयात सहभागी होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सारा आणि विकीच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोघेही CSK जिंकल्यानंतर जल्लोष करताना दिसत आहेत. सारा आणि विकी आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहे. विकीला खूपच आनंद झाला आहे. आनंदात तो डोक्यावर हात मारताना दिसत आहे. चेन्नई जिंकल्यानंतर स्टेडियमध्ये फाटक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे.
विकी कौशलने शेअर केला व्हिडीओ (Vicky Kaushal Shared Video)
विकी कौशलने स्टेडियममधील व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"बदले माही... लेके जो कोई सारी, दुनिया भी दे अगर तो किसे दुनिया चाहिए! माही फॉर द विन... जड्डू तू खरचं रॉकस्टार..काय मस्त मॅच झाली...GT... स्पर्धेतील सर्वोत्तम संघ. #ipl2023 #iplfinal".
सारा अली खान आणि विकी कौशलचा सिनेमा कधी होणार रिलीज? (Zara Hatke Zara Bachke Released Date)
विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खानचा (Sara Ali Khan) आगामी 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)