Nashik Accident : मंदिरात पारायणाला निघालेल्या वयोवृद्ध महिलेस ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू; नाशिकच्या बळी मंदिर चौफुलीवरील दुर्दैवी घटना
Nashik Accident News : नाशिक शहरातून भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील बळी मंदिर चौफुलीवर काल (3 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.

Nashik Accident News : नाशिक शहरातून भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील बळी मंदिर चौफुलीवर काल (3 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. यात बळी मंदिरात पारायण जाणाऱ्या राधाबाई गायकवाड या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेस भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात राधाबाई गायकवाड यांचा जागीच (Nashik Crime News)मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पलायन केले. मात्र या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
पंचवटी पोलिसांत चालका विरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिसांत चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण महिना सुरू असल्यामुळे बळी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमासाठी राधाबाई या दररोज येत असत. अशातच त्या काल दररोजप्रमाणे येत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि त्यात त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोथिंबीरीला मिळतोय कवडीमोल भाव, शेतकरी आर्थिक संकटात
नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पालेभाज्याची आवक वाढली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडून कोथिंबीर पीक श्रावण महिन्यात मोठी मागणी असल्याकारणाने घेतले जाते मात्र जास्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या कोथिंबीरचे पिकात आवक वाढल्यामुळे शेकडा एक हजार भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भांडवली खर्च देखील वसूल होणार का असा प्रश्न पडला आहे
रुग्णवाहिकेअभावी खाटेवर झोपवून पोहोचवले रुग्णालयात; एटापल्लीतील घटना
ट्रॅक्टर अपघातात एका जखमी रुग्णाला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने खाटेवर टाकून चार नागरिकांच्या साह्याने रुग्णालयात पोहोचवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार एटापल्ली तालुक्यातील पेंदुळवाही गावात घडला आहे. या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि दिरंगाई पुन्हा एकदा समोर आली आहेत. मनिराम रामा हिचामी हे 35 वर्षीय शेतकरी आपल्या शेतात धानाची रोवणी करण्यासाठी टॅक्टरच्या साहाय्याने चिखल करीत होते. दरम्यान, चिखलात टॅक्टर फसला आणि अचानक तो उलटला. या अपघातात मानिरामच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी लगेच रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र दुर्दैवाने जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे मानिरामला चक्क एका खाटेवर झोपवून 3 किलोमीटरचा खडतर जंगलमय रस्ता पार करून कसुरवाही गावापर्यंत आणण्यात आले आणि तिथून वाहनाने जारावंडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात पुरेशी साधनसामग्री, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि वेळेवर मिळणाऱ्या रुग्णवाहिकेचा अभाव या समस्या वारंवार समोर येत आहेत.
आणखी वाचा
























