(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : 'आलिया भोगासी असावे सादर', वर्षा उसगांवकर-निक्कीच्या वादावर बिग बॉसच्या माजी स्पर्धकाचे फक्त चारच शब्द
Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीमध्ये झालेल्या वादावर बिग बॉसच्या माजी स्पर्धकाने केवळ चारच शब्दांत टीप्पणी केली आहे.
Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) या नव्या सिझनमध्ये स्पर्धकांसाठी चक्रव्यूहाची रचना करण्यात आलीये. त्यामुळे हे चक्रव्यूह भेदण्यासाठी आता प्रत्येकाचा संघर्ष सुरु झालाय. त्यामुळे बिग बॉसच्या घरात सध्या वातावरण चांगलच तापलं आहे. त्यातच आता घरातल्या सदस्यांमध्ये वादाच्या ठिणगी देखील पडत असून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळात आहे.
सदस्यांमध्ये होणाऱ्या या शाब्दिक फाईटवर बिग बॉसच्या घरातील माजी सदस्याने फक्त चारच शब्दांत टिप्पणी केली आहे. त्याच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे बिग बॉसच्या घरात होणाऱ्या भांडणांवर घरातले माजी स्पर्धकही भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतंय. उत्कर्ष शिंदेच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
उत्कर्ष शिंदेची पोस्ट नेमकी काय?
उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने फक्त चारच शब्दांत घरातील भांडणांवर भाष्य केलं आहे. उत्कर्षने पोस्ट करत म्हटलं की, 'आलिया भोगासी असावे सादर.' त्याची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे. कारण यावर त्याने निक्की आणि वर्षा उसगांवकरांचा फोटो शेअर केला आहे.
निक्की आणि वर्षा उसगांवकरांमध्ये राडा
बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि आर्यामध्ये फाईट, बिग बॉसच्या घरातलं वातावरण झालंय टाईट