Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि आर्यामध्ये फाईट, बिग बॉसच्या घरातलं वातावरण झालंय टाईट
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आता भांड्याला भांड लागत असून आर्या आणि निक्कीमध्येही शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सध्या वातावरण चांगलच टाईट झालं असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता वर्षा आणि निक्कीनंतर आता निक्की आणि आर्यामध्येही भांडणं झालं आहे. यामध्ये घरातल्या इतर सदस्यांनी देखील उडी घेतली. त्यामुळे वातावरण चांगलच बिघडलं असल्याचं पाहायला मिळतंय.
पहिल्याच टास्कमध्ये नियमभंग झाल्याने बिग बॉसने घरातल्यांना आता एक आठवडा जमिनीवर झोपण्याची शिक्षा दिली आहे. त्यावरुन निक्कीने वर्षा उसगांवकरांवर आरोप करत त्यांना यासाठी जबाबदार धरलं. त्यामुळे निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.
आर्या आणि निक्कीमध्ये नेमकं काय झालं?
आर्या आणि निक्की वाद होतात, तेव्हा आर्या निक्कीला म्हणते की, तुला घाबरायला पाहिजे.त्यावर निक्की आर्याला म्हणते की, तू फट्टू आहेस एक नंबरची. त्यामध्येच निक्की आणि अरबाजमध्येही हडतुड झाली. त्यामुळे या वादात घरातल्या इतर सदस्यांनी देखील उडी घेतली. आता या वादाचे काय पडसाद उमटणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
बिग बॉसच्या घरात निक्की-अंकिताचा राडा
कोकण हार्टेड गर्ल अंकितावर निक्कीने आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता नॉमिनेशन टास्कमध्ये आता अंकिता आणि निक्कीमध्ये कडाक्याची भांडण झाले आहे. टास्क दरम्यान निक्की अंकिताला धक्का देत असते. त्यावर अंकिता आक्षेप घेते. त्यानंतर निक्की अंकिताला धक्का देते. अंकिता चिडून मला धक्का देऊ नकोस असे सांगते आणि तिला ढकलते. त्यावर निक्की मला हात लावायचा नाही असे ओरडून अंकिताला सांगते.
निक्कीने काढली वर्षा उसगांवकरांची अक्कल
बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा.
View this post on Instagram