एक्स्प्लोर
Voter List Scam: 'एकेका बापाला 40 पोरं, पण बाप ब्रह्मचारी', Sanjay Raut यांचा भाजपवर थेट हल्ला
शिवसेनेच्या (UBT) निर्धार मेळाव्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मतदार यादीतील घोटाळ्यावरून (Voter List Scam) भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. 'एकेका बापाला चाळीश-चाळीश पोरं व बाप ब्रह्मचारी!', असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला. आपल्या भाषणात त्यांनी महाभारताचा दाखला देत भाजपची तुलना कौरवांशी केली. धृतराष्ट्राला शंभर पुत्र कसे झाले, याचं उत्तर आजच्या मतदार याद्या पाहिल्यावर मिळतं, असं म्हणत राऊत यांनी बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















