एक्स्प्लोर
Mission Mumbai: 'विरोधकांचा सुपडा साफ करा', Amit Shah यांचा BJP कार्यकर्त्यांना आदेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. मुंबईतील भाजपच्या (BJP) नव्या प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. 'आता डबल इंजिन सरकार नको तर ट्रिपल इंजिन सरकार हवं', असे वक्तव्य अमित शाह यांनी केले. भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीत इतक्या ताकदीने लढावे की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे आणि ते दुर्बिणीनेही सापडता कामा नयेत, असे आवाहन शाह यांनी केले. महाराष्ट्रात भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालत नाही, तर स्वतःच्या ताकदीवर उभी आहे, असेही ते म्हणाले. या 'ट्रिपल इंजिन'मध्ये तहसील पंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांचा समावेश करून एकहाती सत्ता मिळवण्याचे लक्ष्य त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अकोला
सांगली
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















