Zomato : बहिणीच्या लग्नाआधी झोमॅटो डिलिव्हरी बॉयचं अकाऊंट ब्लॉक, भररस्त्यात रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; कंपनीने घेतली दखल
Zomato Delivery Boy Video : सध्या सोशल मीडियावर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा रडतानाचा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. बहिणीच्या लग्नाच्या आधी या डिलिव्हरी बॉयचं अकाऊंट कंपनीने ब्लॉक केलं आहे.
Zomato Delivery Boy Viral Video : सध्या खवय्यांमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कंपन्यांची क्रेझ वाढत आहे. स्विगी, झोमॅटो यासारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून झटपट जेवण मागवण्याचं प्रमाण आजकाल वाढताना दिसत आहे. या फूड डिलिव्हरी कंपन्यांमुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पण, कधी-कधी या फूड डिलिव्हरी बॉयजला (Delivery Boy Viral Video) मारहाणीचे किंवा इतर काही व्हिडीओही चर्चेत येतात. सध्या सोशल मीडियावर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा (Zomato Delivery Boy) व्हिडीओ खूप तर्चेत आहे.
झोमॅटोकडून डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल
दिल्लीतील एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयसोबत घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. सर्वत्र या व्हिडीओवर हळहळही व्यक्त केली जात आहे. याचं कारण असं की, झोमॅटो कंपनीने या डिलिव्हरी बॉयचं अकाऊंट ब्लॉक केल्याचं गाऱ्हाण हा डिलिव्हरी बॉय मांडताना दिसत आहे. हा झोमॅटो डिलिव्हरी बॉय भररस्त्यात रडत होता आणि त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी मदतीचं आवाहन करत होता. याचा व्हिडीओ एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आलं आहे.
बहिणीच्या लग्नाच्या आधी डिलिव्हरी बॉयचं अकाऊंट ब्लॉक
या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचं अकाऊंट कंपनीकडून अचानक ब्लॉक करण्यात आलं, तेही नेमकं त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या काही दिवस आधी. फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने डिलिव्हरी बॉयचं खाते ब्लॉक केलं. सोहम भट्टाचार्य नावाच्या एका ट्विटर म्हणजेच एक्स मीडिया युजरने शेअर केलेल्या पोस्टमुळे हा डिलिव्हरी बॉय चर्चेत आला. सोहम भट्टाचार्य एक्स युजरने जीटीबी नगरमधील झोमॅटो डिलिव्हरी मॅनची कहाणी शेअर केली.
झोमॅटो बॉयचा भररस्त्यात रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
सोहम भट्टाचार्य या युजरने त्याच्या एक्स मीडिया अकाऊंटवर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटो पोस्ट करत लिहिलं की, 'या व्यक्तीच्या बहिणीचे लग्न काही दिवसांवर आहे आणि झोमॅटो, झोमॅटो केअरने त्याचं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. तो जीटीबीनगर जवळ रडत बसला होता, प्रत्येकाकडे जाऊन पैसे मागत होता. त्याने मला सांगितलं की, त्याने बहिणीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यासाठी काहीही खाल्लेलं नाही. कृपया शक्य असल्यासही पोस्ट व्हायरल करा.' सोहमने 28 मार्चला या पोस्टसोबत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटो शेअर केला होता.
नेमकं काय घडलं?
या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचं नाव आयुष सैनी (Ayush Saini) असल्याचं बोललं जात आहे. सोहम भट्टाचार्यने सांगितलं की, 'मी कामावरून परतत होतो आणि हा व्यक्ती मला रडताना दिसला. दादा, मला मदत करा, मी असहाय्य आहे. माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि झोमॅटोनं माझं अकाऊंट बंद केलं आहे.उद्या मला तंबूवाल्यांना पूर्ण पैसे द्यायचे आहेत, पण झोमॅटो विक्रेत्याने माझे अकाऊंट डिलीट केलं आहे, आणि मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही, असं डिलिव्हरी बॉयने त्याला सांगितलं.
नेटकऱ्यांनी झोमॅटो कंपनीला विचारला जाब
आपल्या पोस्टमध्ये सोहमने फॉलोअर्सना पोस्ट शेअर करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर सोहमच्या पोस्टला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि ही पोस्ट व्हायरल करण्यात आली. सोहमने ही ऑनलाइन पोस्ट शेअर केल्यानंतर ही पोस्ट सुमारे 5 दशलक्ष युजर्सने पाहिली आणि व्हायरल केली. यानंतर नेटकऱ्यांनी झोमॅटो कंपनीला जाब विचारला आहे. या पोस्टने नेटकऱ्यांसह तर झोमॅटोचंही लक्ष वेधून घेतलं.
झोमॅटोनं घेतली घटनेची दखल
We deeply value our delivery partners, and we understand the impact that actions like blocking an ID can have. Rest assured, we take such matters seriously. We assure you, we'll look into this. Our delivery partners are as important to us as our customers.
— Zomato Care (@zomatocare) March 28, 2024
प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचं झोमॅटोचं आश्वासन
झोमॅटोने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. झोमॅटोने या प्रकरणाची दखल घेत झोमॅटो केअरच्या अधिकृत एक्स खात्यावरुन सोहमच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि म्हटलं की 'आयडी ब्लॉक करण्यासारख्या कृतींचा काय परिणाम होऊ शकतो याचा आम्हाला अंदाज आहे. आम्ही या या प्रकरणाची दखल घेतली असून याचा गांभीर्याने तपास करण्यात येईल.
दरम्यान, डिलिव्हरी बॉयला मदत करण्यासाठी सोहमने कमेंट सेक्शनमध्ये एक QR कोड शेअर केला आणि त्याच्या फॉलोअर्सला त्या व्यक्तीला मदत करण्याची विनंती केली आहे.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
Zomato charged us so much taxes and exploits their employee like this
— Ashwani Tiwari (@tiwariashwani33) March 28, 2024
Kids in Lower Middle Class.families, d youth goes away working very hard, supporting d family. Do you realize how these boys wait under d shade of trees, till d order is being prepared. Whether it's winter or summer time. Don't harass them for money-Their curse would destroy U. pic.twitter.com/uhjQMeQEe9
— JyotsnaDeviMardaraj (@jyotsnadevi33) March 28, 2024
दरम्यान, या घटनेचा फायदा घेत काही स्कॅमर्सने चुकीचे क्यूआर कोड व्हायरल करत पैसे कमवण्याचा चुकीचा मार्ग शोधल्याचंही सांगितलं जात आहे.
#ScamAlert
— Shreela Roy (@sredits) March 29, 2024
This 🆘 is FAKE! DO NOT donate or endorse it. It’s one of those scamsters trying to make quick money by posting false cases. No one has successfully been able to get details directly from this Zomato rider. They’re only trying to use the QR and make money. pic.twitter.com/J7QbskcXpw
महत्त्वाच्या इतर बातम्या :