Viral Video : लग्नपत्रिकेतून अंमली पदार्थांच्या तस्करी, महिला अटकेत, असा झाला खुलासा
Smuggling in Wedding Card : लग्नाच्या पत्रिकेतून अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या महिलेला मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अटक करत ड्रग्ज जप्त केले.
Drugs in Wedding Card : आजकाल गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी वेगवगळ्या युक्ती करताना दिसतात. गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढतात. मात्र हे पोलिसांच्या तावडीतून काह सुटत नाहीत. कारण गुन्हेगार स्वत:ला जितके हुशार समजतात. त्यांच्या दोन पाऊलं पुढे सुरक्षा यंत्रणा असते. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. तुम्ही आतापर्यंत अंमली पदार्थ तस्करी करण्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. कधी कमरेच्या पट्ट्यातून, कधी शूज, कधी बॅग तर कधी अजून काही. तस्करी करण्यासाठी लोकं अनेक मार्ग शोधतात. एका महिलेनं अंमली पदार्थ तस्करीसाठी असाच वेगळा मार्ग शोधून काढला, मात्र तिचा प्रयत्न पुरता फसला.
अंमली पदार्थ तस्करीचा प्रयत्न
आजकाल ड्रग्स तस्करीसंदर्भातील अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. एका महिलेनं चक्क लग्नपत्रिकेतून ड्रग्स तस्करी करण्याचा प्रयत्न केला पण कस्टम विभागाच्या तावडीत ती सापडलीच. एका महिने आपली तल्लख बुद्धी वापरत लग्नपत्रिकेच्या साहाय्याने अंमली पदार्थ तस्करी करण्याचा प्रयत्न केला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तुम्हाला यामध्ये फिल्मी स्टाईल अंमली पदार्थ तस्करी दिसून येईल.
पाहा व्हिडीओ : लग्नपत्रिकेतून ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न
View this post on Instagram
कस्टम विभागाने एका महिलेचा अंमली पदार्थ तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. महिलेने लग्नपत्रिकेच्या आतमध्ये अंमली पदार्थ लपवले होते. कस्टम विभागाने याचा भांडाफोड करत अंमली पदार्थ जप्त केले. तुम्हाला व्हायरल व्हिडीओमध्ये दिसेल की, या महिलेनं लग्नपत्रिकेच्या आतमध्ये एका पिशवीमध्ये ड्रग्ज लपवूनवरून पूर्ण पॅकींग केलं होतं. लग्नपत्रिकेची एक-एक खर हटवल्यानंतर आतमध्ये लपवलेले ड्रग्ज दिसतात. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटवर शेअर केला आहे.
A girl with #WeddingCards caught on the #Airport.
— Rupin Sharma (@rupin1992) September 11, 2022
The #Cards contained #DRUGS
Be careful ... do not take anything from anyone on the airport,
Regardless of its shape, size, item. Neither old nor young, male/female/child, anyone whosoever ! pic.twitter.com/IM64El9K1u
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.