(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maldives : हनीमूनसाठी जोडप्यांची पहिली पसंत मालदीव, पण येथेच घटस्फोटाचं प्रमाण सर्वाधिक, काय आहे कारण?
Highest Number of Divorces in Maldives : हनिमूनर्सची पसंती असलेल्या मालदीवमध्ये सर्वाधिक घटस्फोट होतात. मालदिवमध्ये सर्वात जास्त घटस्फोट होतात. याबाबतील मालदिवने अमेरिका आणि भारतालाही मागे टाकलं आहे.
Maldives has Highest Divorce Rate : मालदीव सुट्ट्या घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी मालदीवचं खास आकर्षण आहे. अनेक नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी मालदीवला पसंती देतात. लग्नानंतर भारताबाहेर फिरायला जाण्याच्या यादीत मालदीवचं नाव पहिलं असतं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, हनिमूनर्सची पसंती असलेल्या मालदीवमध्ये सर्वाधिक घटस्फोट होतात. मालदीवमध्ये सर्वात जास्त घटस्फोट होतात. याबाबतील मालदीवने अमेरिका आणि भारतालाही मागे टाकलं आहे. पण मालदीवमध्ये सर्वाधिक घटस्फोट होण्याचं नेमकं कारण काय, जे जाणून घ्या.
हनिमूनर्सची पसंती असलेल्या मालदीवमध्ये सर्वाधिक घटस्फोट
मालदीवचा स्वच्छ समुद्रकिनारा सुंदर जोडप्यांना आकर्षित करतो. जगभरातील जोडप्यांना नक्कीच मालदीवला एकदा तरी भेट देण्याची इच्छा असते. मात्र येथे सर्वाधिक घटस्फोटाची प्रकरणं समोर येत आहेत. जगभरात सर्वाधिक घटस्फोटांच्या बाबतीत मालदीव पहिल्या क्रमांकावर आहे. मालदीवमध्ये दर 1000 लग्नांपैकी 5.52 टक्के जोडप्यांचा घटस्फोट होतो. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बेलारुस असून तेथील घटस्फोटाचं प्रमाण 4.63 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका 2.39 टक्के, चौथ्या क्रमांकावर रशिया 2.30 टक्के, पाचव्या क्रमांकावर लुथिआनिया 2.18 टक्के इतकं घटस्फोटाचं प्रमाण आहे.
सुंदर समुद्रकिनारे आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवला हनिमूनर्सचे नंदनवन देखील म्हटलं जातं. जगभरातून नवविवाहित जोडपे नवीन येथे भेट देतात. पण हा मालदीव हा जगातील असा देश आहे जिथे सर्वाधिक घटस्फोट होतात. हे अनेक दशकांपासून चालत आलेलं आहे. 2000 मध्ये सुमारे 40 हजार विवाह झाले तर, 40 हजार घटस्फोटही झाले.
30 वर्षांच्या महिलांचा सरासरी 3 वेळा घटस्फोट
हिंदी महासागरात वसलेल्या या छोट्याशा देशात घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक घटस्फोटाच्या आकडेवारीनुसार, मालदीवमध्ये सध्या दर हजार विवाहांमागे 5.52 घटस्फोट होत आहेत. हा डेटा अमेरिका, कॅनडा किंवा कोणत्याही देशापेक्षा खूप जास्त आहे. एका रिपोर्टनुसार, येथील 30 वर्षांच्या महिलांचा सरासरी तीन वेळा घटस्फोट झालेला आहे.
काय आहे यामागचं कारण?
मालदीव हा समुद्र किनाऱ्यांचा देश आहे. प्राचीन काळापासून येथे मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येथील मच्छीमार दूर समुद्रात मासेमारीसाठी आणि इतर देशात व्यापारासाठी जातात. हे मच्छिमार कधी आणि केव्हा घरी परततील याची काहीही माहिती नसते. त्यामुळे प्राचीन काळापासून येथील लोक मासेमारी किंवा व्यापारासाठी जाताना पत्नीला घटस्फोट देतात. हे फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. पती आणि पत्नी जास्त कालावधीसाठी दूर राहिल्यानंतर त्यांना त्याच जोडीदाराबरोबर आयुष्य घालवू अशी आशा नसते. त्यामुळे त्यांना नैतिकतेमध्ये अडकून राहणं आवडत नाही, परिणामी येथे घटस्फोटांचं प्रमाण अधिक आहे.