Hotel Rooms : हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का असते? 'या' मागचं कारण माहित आहे का?
White Bedsheet : सर्व हॉटेल्समध्ये फक्त पांढऱ्या बेडशीट वापरल्या जातात हे तुम्ही पाहिलंच असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का, हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का वापरतात? जाणून घ्या या मागचं कारण.
White Bedsheets In Hotel Rooms : स्वस्त असो वा महागडं, साधं असो वा फाईव्ह स्टार सर्वच हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये (Hotel Rooms) तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या चादर (White Bed Sheet) पाहायला मिळतात. सर्व हॉटेल्सच्या खोल्यांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्या बेडशीट ठेवल्या जातात हे तुम्ही पाहिलंच असेल. हे बघून तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का किंवा तुम्ही कधी विचार केलाय का, हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का वापरतात दुसऱ्या रंगाची का नाही? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
'या' कारणामुळे हॉटेल्समध्ये पांढऱ्या बेडशीट वापरतात
हॉटेलच्या खोल्यांमध्ये पांढऱ्या चादर अर्थात बेडशीट किंवा उशीचं कव्हर वापरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पांढऱ्या चादरी स्वच्छ करणे खूप सोपं आहे. हॉटेल्समध्ये एकाच वेळी सर्व खोल्यांमधील चादरी आणि कव्हर ब्लीच वापरून धुतले जातात, तसेच त्या बेडशीट क्लोरीनमध्येही भिजवल्या जातात. अशा वेळी जर या चादरी रंगीत असतील तर त्यांचा रंग लवकरच फिकट होऊ लागतो त्यामुळे इतर रंगाच्या चादरी दिसायला रंग उडालेल्या दिसातात. पण पांढऱ्या रंगाच्या चादरींच्या बाबतीत ही समस्या नसते.
लक्झरी लाईफस्टाईलसाठीही पांढऱ्या बेडशीटचा वापर
पांढरा रंग सामान्यतः लक्झरी लाईफस्टाईलशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत हॉटेलच्या खोलीतील पांढरी बेडशीट खोलीला लक्झरी लुक देण्याचे काम करते. याशिवाय कमी किमतीत जाड चादरी खरेदी करण्यासाठी पांढरा रंग हा उत्तम पर्याय आहे.
ब्लीच आणि क्लोरिन का वापरतात?
पांढऱ्या रंगाच्या चादरीवरील डाग ब्लीचच्या मदतीने सहज साफ होतात शिवाय याचा कलरची उडण्याचा प्रश्न येत नाही. याशिवाय उन्हाळा आणि पावसाळ्यात ओलसरपणामुळे अनेकदा बेडशीटला दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे ब्लीच आणि क्लोरीन वापरल्याने बेडशीटला दुर्गंधी येत नाही. यासोबतच त्यांना डागमुक्त ठेवणंही होतं. त्यामुळे बहुतांश हॉटेलच्या खोल्यांमध्ये फक्त पांढऱ्या बेडशीटचाच वापर केला जातो.
पांढऱ्या बेडशीट वापरायला सुरुवात कशी झाली?
हॉटेल्समध्ये पांढरी बेडशीट घालण्याची प्रक्रिया 90 च्या दशकानंतर सुरू झाली. 1990 पूर्वी चादरींवरील डाग लपविण्यासाठी रंगीत बेडशीटचा वापर केला जायचा.पण 1990 नंतर, पाश्चिमात्य हॉटेल डिझायनर्सनी खोलीला लक्झरी लुक देण्यासाठी आणि ग्राहकांना आरामदायी अनुभव देण्यासाठी पांढरी बेडशीट वापरायला सुरुवात केली. त्यानंतर ही संकल्पना सर्वत्र पसरली.
पांढरा सकारात्मकता आणि शांततेचे प्रतीक
पांढऱ्या रंग सकारात्मकता आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. यामुळेही हॉटेल रुममध्ये शांतपणे झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या बेडशीटचा वापर करणे उत्तम मानलं जातं. पांढरा रंग मनाला शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी फायदेशीर मानला जातो.