Viral Video : 'सी फॉर कॅट नाही, मांजर', अभ्यासावरून दोन भावंडांमध्ये भांडण, पाहा व्हिडीओ
Viral Video : नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये (Viral Video) दोन भावंडांमधील गोड भांडण पाहायला मिळत आहे. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
Viral Video : भावांचं प्रेम हे सगळ्यात वेगळं असतं. जिथे एकीकडे दोन भाऊ अनेकदा कुरबुरी करताना आणि एकमेकांशी भांडताना दिसतात. दुसरीकडे जेव्हा अडचण येते तेव्हा फक्त भाऊ दुसऱ्या भावाच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो. नुकत्याच समोर आलेल्या अशाच एका व्हिडीओमध्ये (Viral Video) दोन भावंडांमधील गोड भांडण पाहायला मिळत आहे. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
घरात दोन लहान-मोठे भावंडे असतील तर ते कधी भांडताना दिसतात तर कधी एकमेकांवर प्रेम करताना, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. अशाच या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) तुम्ही दोन भावांमध्ये एक गोंडस वाद झाल्याचं पाहू शकता. ज्यामध्ये मोठा भाऊ आपल्या लहान भावाला शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. इंग्रजी शिकवताना मोठा भाऊ लहान भावाला C for Cat वाचायला सांगतो. पुस्तकात छापलेले चित्र पाहताना धाकटा भाऊ त्याला मांजर म्हणतो.
Viral Video : भावंडांचा हे प्रेमळ भांडण नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले
व्हिडीओत (Viral Video) दिसत असल्याप्रमाणे, मोठा भाऊ लहान भावाला शिकवताना इंग्रजीमध्ये कॅट म्हणण्यास सांगतो. ज्यावर लहान भाऊ त्याला नकार देत, त्याला सतत मांजर म्हणत राहतो आणि शेवटी तो रडायला लागतो. हा संपूर्ण वाद त्याच्या आईने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. जो सोशल मीडियावर trending_reels_00i नावाच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
Viral Video : 6 मिलियनहून अधिक लोकांनी पाहायला हा व्हिडीओ
भावंडांचा हा क्यूट व्हिडीओ (Viral Video) यूजर्सची मने जिंकत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच चेहरे फुलले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओला (Viral Video) आतापर्यंत 2 लाख 85 हजारांहून अधिक लाईक्स आणि 6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्स यावर आपल्या मजेदार कमेंट देखील करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, पुढील वर्षी हाच व्हिडीओ (Viral Video) हिंदी दिवसावर शेअर करणार. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, 'हे मूल आमची हिंदी भाषा वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.'