एसीतून अचानक बाहेर आला भलामोठा साप, बाहेर पडताच उंदराची केली शिकार; धडकी भरवणारा व्हिडीओ पाहा
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) रोज काहीना काही व्हायरल होत असते. कधी अजगर घरावरुन उडी मारत शिकार करतो. तर कधी साप आणि मुंगूस यांची भांडणे आपल्याला व्हीडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) रोज काहीना काही व्हायरल होत असते. कधी अजगर घरावरुन उडी मारत शिकार करतो. तर कधी साप आणि मुंगूस यांची भांडणे आपल्याला व्हीडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मात्र, अनेकदा घरातून बाहेर पडणाऱ्या सापांच्या व्हिडिओमुळे (Viral Video) आपण घाबरुन जातो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Socail Media) व्हायरल झाला. व्हीडिओ (Viral Video) पाहाताच अनेकांना धडकी भरली आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहिला असता समजते की, साप एका एसीमध्ये लपला आहे. तो एसीमधून हळूहळू बाहेर पडतो. लटकलेल्या अवस्थेतत तो एका उंदराची शिकार करतो. दरम्यान, शिकार केल्यानंतर तो पुन्हा एकदा एसीमध्ये शिरतो. साप घराच्या छतावरील तारेच्या सहाय्याने खाली आला असावा. त्यानंतर तो घरातच घुसलेला पाहायला मिळाला. मात्र, उंदराची शिकार करण्यासाठी त्याला एसीतून बाहेर यावे लागले.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला 4 लाख 87 हजारांपेक्षा जास्त लाईक आले आहेत. शिवाय आत्तापर्यंत 600 पेक्षा लोकांनी हा व्हिडिओ लाईक देखील केला आहे. एका मीम शेअर करणाऱ्या पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. @queburrada.ar असे या इन्स्टाग्राम पेजचे नाव आहे.
साप आणि उंदराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोक मोठ्या संख्येने या व्हिडिओला शेअर करताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओवर अनेक मजेजीर कमेंट्स देखील आल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, मी कधीही असे दृश्य पाहिले नाही, ज्याच्या रिमोटमध्ये उंदराची शिकार करण्याचा पर्याय आहे. शिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, "आत्ता समजले की, या घराचे भाडे इतके स्वस्त कसे आहे ते..उंदराच्या जागी मांजर असायला हवी होती".
याशिवाय आणखीही काही मजेदार कमेट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, मी एकमेव असा माणूस आहे का?, ज्याला तो साप आहे हे समजायला 10 सेकंड लागले. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, हे तेव्हा होते, जेव्हा तुम्ही प्रत्येक आठवड्यात टेक्निशिअनला संपर्क करत नाहीत.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
Anil Kapoor : हृतिक रोशनकडून तोंडभरुन कौतुक अन् अनिल कपूर यांना अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?