Viral Video: हजारो फूट उंचीवरून विमानातून रेकॉर्ड केले आकाशातील 'असे' अद्भुत दृश्य! नेटकरी आश्चर्यचकित, 'जणू आकाशात पार्टी होतेय'
Viral Video : हजारो फूट उंचीवरून विमानातून आकाशातील हे अद्भुत दृश्य पाहून तुमचे डोळे विस्फारतील, सोशल मीडियावर हा काही क्षणातच व्हिडीओ व्हायरल झाला आहे
Thunderstorms Viral Video : हजारो फूट उंचीवरून उडणारे विमान.. ढगांमधून विजेचा लखलखाट... आणि विमानातून मोबाईलमधून कैद केलेले एक अद्भूत दृश्य, जे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण असे दृश्य यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. यासोबतच हा व्हिडीओ सोशल मीडियावरही (Social Media) वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ क्षणातच व्हायरल झाला, लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप कमेंट्सही केल्या. यूजर्स म्हणाले की, आकाशात पार्टी होत असल्याचे भासत आहे.
हजारो फूट उंचीवरून मोबाईलमध्ये कैद दृश्य
सोशल मीडियावर दररोज असे शेकडो व्हिडीओ आणि पोस्ट समोर येतात, जे पाहता पाहता व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये विमानातून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा मनमोहक व्हिडीओ परमप्रीत नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला असून, हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे. हजारो फूट उंचीवरून वीज कोसळल्याची घटना या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आहे.
View this post on Instagram
मनमोहक दृश्य काहीसे असे दिसत होते
दरम्यान, हा व्हिडिओ आकाशात उसळणाऱ्या एका वादळाचा आहे, या वादळादरम्यान हजारो फूट उंचीवर वीज कोसळली तेव्हा एका व्यक्तीने ते दृश्य आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. वादळामुळे संपूर्ण आभाळात अंधार दिसू लागला आणि विजांचा कडकडाट होऊ लागला. अचानक वीजही चमकली, हे सर्व दृश्य बघून जणू आकाशात फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचा भास झाला. आकाशातील ही वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जाताना दिसत होती. जमिनीच्या तुलनेत हजारो फूट उंचीवर हे दृश्य खूपच अद्भूत दिसत होते. युजरने दावा केला आहे की, त्याने 35 हजार फूट उंचीवरून हे अद्भुत दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे.
'आकाशात पार्टी होतेय?' लोकांच्या प्रतिक्रिया
इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ पाहताच व्हायरल झाला. हजारो लोकांनी त्याला लाईक केले, लोक हा व्हिडीओ शेअरही करत आहेत. आकाशातून रेकॉर्ड केलेला वादळाचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतोय. यासोबतच कमेंट्सचाही वर्षाव होत आहे. अनेक लोक आपली प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत की, ढगांवर राहणारे लोक पार्टी करत असल्याने फटाके उडवत आहेत. तर अनेक लोक या व्हिडीओला खूप भयानक दृश्य म्हणत आहेत. तर दुसऱ्या युजरने सांगितले की, कोणीतरी टॉर्च घेऊन ढगांमधून इकडून तिकडे पळत आहे.