Viral Video : गाणं वाजताच नवरीचा स्टेजवर भन्नाट आणि बिनधास्त डान्स, नवरा शांतपणे उभा, लोक म्हणाले- कमालीचा आत्मविश्वास..!
Viral Video : वराची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचल्यावर सर्वजण नाचताना दिसतात. पण आजकाल नववधूही त्यांच्यात लग्नात बिनधास्त नाचताना दिसतात.
Viral Video : भारतातील लग्न (Indian Wedding) म्हटलं की डान्स शिवाय अपूर्ण आहे. मग ती मिरवणूक असो किंवा क वधू-वर, लोकं जोरदार नाचतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर असे समजते की, आता ते दिवस राहिले नाही, जेव्हा वधू तिच्या लग्नाच्या दिवशी खिडक्यांमधून लग्नाच्या मिरवणुका पाहत असायची. पण, आता केवळ वराचे मित्रच नव्हे तर वधूच्या मैत्रिणी लग्नात मनसोक्त नाचतात. वराची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचल्यावर सर्वजण नाचताना दिसतात. पण आजकाल नववधूही त्यांच्यात लग्नात भन्नाट नाचताना दिसतात. असाच एक व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.
दूल्हा बेचारा फंस गया pic.twitter.com/0WwCJB6jXL
— Anamika Thakur (@anamika943) October 19, 2022
लग्नात नवरा शांतपणे उभा, वधू मात्र बिनधास्त...
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वधू स्टेजवर भन्नाट नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नवरा शांतपणे उभा आहे आणि वधू जोरदार नाचताना दिसत आहे. या दरम्यान वराची अवस्था बघायला मिळते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना वराची कीवही येते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा दिवस नक्कीच आनंददायी जाईल
पण वधूचे नृत्य सुरूच...!
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. दरम्यान, गाणे वाजते आणि वधू-वर स्टेजवर नाचताना दिसतात. वर थोडा वेळ नाचतात, पण वधू थांबण्याचे नाव घेत नाही. ती स्टेजवर भन्नाट स्टेप्स करते. तिने या दिवसासाठी खूप तयारी केली असावी असे दिसते. एका ठिकाणी वर खुर्ची मागत बसतो पण वधूचे नृत्य सुरूच असते. लोक एकामागून एक स्टेजवर येतात आणि तिच्यावर पैसे उधळतात
नेटकऱ्यांच्या मजेशीर कंमेट
@anamika943 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून पाच हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'वधू तिचा आवडता वर मिळाल्यानंतर आनंदाने नाचत आहे! तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'काहीही बोल, आत्मविश्वास भारी आहे वधूचा.! याशिवाय अनेकांनी यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इतर बातम्या
Video Viral : रेल्वे स्थानकानंतर आता ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये नमाज, प्रवाशांची अडवणूक, व्हिडीओ व्हायरल