Viral Video: ख्रिस्तियानो रोनाल्डोला गर्लफ्रेंडने गिफ्टमध्ये दिली 'रोल्स रॉयस', किंमत 2.50 कोटी; पाहा व्हिडीओ
Cristiano Ronaldo Viral Video: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एक व्हिडीओ व्हायरल (Cristiano Ronaldo Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Cristiano Ronaldo Girlfriend) इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
Cristiano Ronaldo Viral Video: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार महिनाभरापूर्वी संपल्यानंतर तो बना क्लबमध्ये सामील होऊ शकतो. सध्या तो आपल्या घरी ख्रिसमस साजरी करत आहे. याच दरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डोचा एक व्हिडीओ व्हायरल (Cristiano Ronaldo Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Cristiano Ronaldo Girlfriend) इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये (Viral Video) गिफ्ट रॅपेड रोल्स रॉयस (Rolls Royce) दिसत आहे. ही कार जॉर्जिनाने रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) गिफ्ट केली आहे. इतकं महागडं गिफ्ट मिळाल्याने रोनाल्डो (Cristiano Ronaldo) थक्क झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) देखील या लक्झरी कारचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्याच्या गर्लफ्रेंडसाठी एक मेसेज लिहिला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) रॉड्रिग्जने (Cristiano Ronaldo) आपल्या चाहत्यांना तिच्या घरी ख्रिसमस कशी साजरी केली जात आहे, हे दाखवलं आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) दिसणार्या काही भेटवस्तूंमध्ये एक रोल्स रॉइस कार (Rolls Royce), काही लुई व्हिटॉन बॅग आणि मुलांसाठी काही सायकल असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
रोल्स-रॉयस (Rolls Royce) गिफ्ट मिळाल्यानंतर रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडला थँक्यू म्हणाला आहे. पोस्ट करत तो म्हणाला आहे की, ''थॅक्यू, माय लव्ह.'' मिरर यूकेच्या वृत्तानुसार, ही कार रोल्स रॉईस फँटम (Rolls Royce) असल्याचे सांगितले आहे. ज्याची किंमत सुमारे 250,000 पौंड (भारतीय चलनात 2.50 कोटी) अपेक्षित आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये मँचेस्टर युनायटेड सोडल्यापासून रोनाल्डो (Cristiano Ronaldo) अजूनही नवीन क्लबच्या शोधात आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, तो सौदी अरेबियाच्या (saudi arabia) अल-नसर संघटनेत सामील होणार होता, परंतु त्याने स्वत: जाहीरपणे ही अफवा असल्याचं म्हटलं आहे.