Viral: '3 सेकंदात उत्तर दिलं, तर JOB तुम्हाला मिळालाच समजा..!' कंपनीच्या CEO चं चॅलेंज, व्हायरल पोस्टवर नेटकऱ्यांचं आश्चर्यकारक उत्तर
Viral: सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कोडे आहे आणि ते सोडवले तर तुम्हाला नोकरी मिळेल, असं आव्हान दिलं जातंय.
Viral: आजकाल नोकरी मिळवण्यासाठी लोक अनेक मुलाखती देतात. त्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विविध प्रश्न विचारण्यात येतात, जर त्याचं योग्य आणि हुशारीने उत्तर दिलं तर मुलाखत घेणारी व्यक्ती प्रभावित होऊन तुम्हाला जॉबसाठी ऑफर करते. सध्या याच्याशी संबंधित एका कंपनीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ज्यामध्ये संबंधित कंपनीच्या CEO ने एक कोडं घालून तरुणांना चॅलेंज दिलंय. जर ते सोडवलं तर ही नोकरी तुम्हाला मिळालीच म्हणून समजा.. असंही त्यात लिहण्यात आलंय. नेमकं काय म्हटलंय व्हायरल पोस्टमध्ये? जाणून घ्या...
नव्या चर्चेला उधाण, लाईक्सचा पाऊस
सोशल मीडिया Reddit वर पोस्ट करण्यात आलीय. ज्यामध्ये एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक कोडे देण्यात आले आहे. या कोडेमुळे लोकांमध्ये नव्या चर्चेला उधाण आले आहे. या व्हायरल पोस्टमध्ये, एका कंपनीचे सीईओ यांचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक कोडे दिले आहे, जे 3 सेकंदात सोडवता आले तर नोकरी मिळण्याची हमी मिळते. ही पोस्ट अपलोड केल्यापासून, तिला 2.8k पेक्षा जास्त लाईक्स आणि 3.1k पेक्षा जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत.
If you’re able to work out this sum, you have a job! Simples!
byu/Back4breakfast inLinkedInLunatics
पोस्टमध्ये काय विशेष आहे?
ही पोस्ट Back4breakfast नावाच्या युजरने Reddit वर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये जेनेसिस कॅपिटल ग्रुपचे सीईओ डिनो डीओन यांचा स्क्रीनशॉट आहे, ज्यात गणिताशी संबंधित कोडे घालण्यात आले आहे. या पोस्टमध्ये डिऑनने सांगितले की, मुलाखतीसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला ब्रेन टीझर दिला जातो. पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला ही नोकरी हवी असेल तर तुमच्याकडे योग्य उत्तर देण्यासाठी 3 सेकंद आहेत. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी एकतर चुकीचे उत्तर दिले किंवा अजिबात उत्तर देऊ शकले नाही त्यांच्यावर विश्वास बसणार नाही, कारण हे अतिशय सोपे कोडे आहे, माझ्या 6 वर्षाच्या मुलाने ते 30 सेकंदात सोडवले आहे. असे ते म्हणाले.
काय आहे 'Only for Geniuses' कोडे ?
डिऑनच्या पोस्टमध्ये दिसलेले कोडे 3*3-3/3+3 होते, ज्याला 'Only for Geniuses' असे शीर्षक होते. हे दिसायला सोपे वाटते, परंतु एक अवघड समीकरण आहे, जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. ही पोस्ट अपलोड केल्यापासून आतापर्यंत 2800 हून अधिक लाईक्स आणि 3100 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
यूजर्सच्या कमेंट्स
या पोस्टवर यूजर्सने वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत, एका यूजरने म्हटले आहे की, त्या माणसाच्या कंपनीत काम करण्याचा बार किती कमी आहे? मला मुलाखतींमध्ये विचारले जाणारे तांत्रिक प्रश्न 3री इयत्तेच्या गणिताच्या समस्यांसारखे असावेत असे मला वाटते. एका यूजरने म्हटले की, मी ते योग्य करू शकलो नाही यावर माझा विश्वासच बसत नाही!
हेही वाचा>>>
Viral: हा काय प्रकार..! गुन्हेगारांना पकडण्याऐवजी पोलीस गातायत भजन? व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांना धक्का
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )