Viral Video: लोकलमध्ये तरुणीचा फालतूचा रुबाब, सीटवरुन पाय काढायला सांगितल्यावर घातला वाद
Mumbai Local Viral Video: समोरच्या सीटवर पाय पसरुन बसणाऱ्या तरुणीला हटकलं असता तिना वाद घालायला सुरुवात केली, त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mumbai Local Viral Video: मुंबईच्या लोकलमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. कधीकधी तर लोकलमध्ये उभ राहायला सुद्धा जागा नसते. दररोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हे दुसरे घरच झाल असून सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा प्रवासी भजनं गाताना दिसतात. लोकलमध्येच इकडे दिवाळी, नवरात्रीसारखे सणदेखील साजरे केले जातात. लोकलमधील प्रवास म्हणजे एक प्रकारची करमणूकच आहे. लोकलमध्ये कधी कधी भांडणंही होतात, बाचाबाचीही होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mumbai Local Viral Video: गैरवर्तन करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल..
या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या समोरच्या सीटवर पाय ठेऊन बसलेली दिसत आहे. समोरच्या प्रवाशाने ज्यावेळी तिला पाय काढ असं सांगितलं त्यावेळी त्या तरुणीने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. आपण वकील असल्याची धमकीही ती तरुणी देते. त्या तरुणीसोबत एक तरुणदेखील असून तोही त्या तरुणीच्या गैरवर्तनाचं समर्थन करताना दिसत आहे. या सगळ्या वादाचा व्हिडीओ काढणं सुरु असताना त्या तरुणीने आपण वकील असल्याची धमकी देत जबरदस्तीने व्हिडीओ बंद केल्याचं दिसतंय.
@MumbaiPolice @Central_Railway @CPMumbaiPolice these people supposed to be lawyers and sitting in the train like this pic.twitter.com/W3dYwtGnSr
— prashantwaydande (@prashantwaydan3) February 1, 2023
सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन
टिकीट घालून प्रवास करतोय म्हणजे ती लोकल आपल्या मालकीची नव्हे, तर ती सार्वजनिक मालकीची आहे याचं भान प्रत्येक जबाबदार नागरिकाला असायला हवं. सार्वजनिक ठिकाणी आपण नियम आणि कायद्याचं पालन करणं खूप महत्वाचं असतं. सार्वजनिक उद्यानं असो किंवा रेल्वे असो, त्याची निगा राखणं आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं असतं.
नागरिकांचा संताप
या उद्धट तरुणीचा व्हायरल झाल्यानंतर आता त्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही लोकल स्वत:च्या मालकीची नाही, त्यामुळे असं पाय सोडून बसणं चुकीचं आहे अशा आशयाची कमेंट अनेकांनी व्यक्त केलीय.
व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत मुंबई पोलिस, सेंट्रल रेल्वे आणि सीपी मुंबई पोलिसच्या ट्विटर अकाऊंटला टॅग केलं आहे. हा व्हिडीओ 17 लाखाहून जास्त लोकांनी पाहिला आहे.
ही बातमी वाचा:























