Viral Video : चालताना अचानक पायाखालचा रस्ता खचला, पण प्रसंगावधान राखत महिलेने वाचवला स्वत:चा जीव
Andhra Pradesh Viral Video : आंध्र प्रदेशमध्ये पावसाने धुमाकुळ घातला आहे. पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालेय.
Andhra Pradesh Viral Video : आंध्र प्रदेशमध्ये पावसाने धुमाकुळ घातला आहे. पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालेय. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूराचं स्वरुप आलेय. अनेक रस्ते पाण्याखाली खचले आहेत. आंध्र प्रदेशमधील पावसातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला चालत असताना अचानक रस्ता खचला.. पण प्रसंगावधान राखत महिलेनं स्वत:चा जीव वाचवला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
आंध्र प्रदेशमधील अंनतपूर जिल्ह्यातील येलनूर येथील हा व्हिडीओ आहे. एक महिला रस्त्यानं जात होती... त्याचवेळी महिलेचा पाय घसरला अन् रस्ता खचला.. अचानकच रस्ता खचला.. पाणी वाहू लागले... प्रसंगावधान राखत महिलेने स्वत:चा जीव वाचवला. जवळच्या लोकांच्या मदतीने ही महिला रस्ता ओलांडण्यात यशस्वी झाली.
पाहा व्हिडीओ..
गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश, कर्नाटकसह इतर राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालेय. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळं झाडं देखील उन्मळून पडली आहेत. वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळं लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळं नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
आत्तापर्यंत कर्नाटकमध्ये पावसामुळं 5.8 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
पावसाच्या घटनांमुळे राज्यात एकूण 23 हजार 794 घरांचे नुकसान झाले आहे. तर शेती पिकांचे देखील पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसामुळं 5.8 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्याची माहिती मंत्री अशोक यांनी दिली आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मदत देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मंत्री अशोक म्हणाले.
दरम्यान, सर्वात भीषण परिस्थिती ही कर्नाटक राज्यातील रामनगरात आहे. तिथे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अेनक ठिकाणी रस्त्यावर उभी केलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. कर्नाटकबरोबरच केरळ आणि आंध्र प्रदेशात देखील पाऊस आणि पुरामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :