(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : हेलीपॅडवर दोन हेलिकॉप्टर्सची टक्कर; काही सेकंदात उडाले तुकडे, व्हिडीओ चर्चेत
Trending Video : दोन हेलिकॉप्टर्सच्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या अपघाताल काही सेकंदात दोन्ही हेलिकॉप्टरचं तुकडे उडाले.
Two Helicopters Accident : तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. कधी मजेदार, गंमतशीर, कधी विचित्र घटनांचे व्हिडीओ, कधी गोंडस प्राण्याचे, तर कधी जंगलातील प्राण्यांच्या शिकारीचे. असे अनेक आगळेवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. अनेक वेळा काही विचित्र घटनांचे व्हिडीओही व्हायरल होतात. असे व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणंही कठीण होऊन जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचं कारण तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल.
विचित्र हेलिकॉप्टर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टर अपघाताचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन हेलिकॉप्टर्स एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. हे दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्यानंतर या दोन्हीही हेलिकॉप्टरचे अक्षरक्ष: काही सेकंदात तुकडे उडताना तुम्हाला दिसेल. हा भयंकर अपघात पाहून व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला आहे. असा अपघात तुम्हीही अद्याप पाहिला नसेल हेलिपॅटवर दोन हेलिकॉप्टर एकमेकांना आदळतात आणि पाहता पाहताच डोळ्यांदेखत त्यांचा चुराडा होतो. या विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
A helicopter landing pic.twitter.com/isQeIeTqbn
— That Looked Expensive (@LookedExpensive) August 7, 2022
अंतराचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर दुर्घटना
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन हेलिकॉप्टरची टक्कर होते. एकाच हेलिपॅडवर दोन हेलिकॉप्टर आले. यावेळी दोन हेलिकॉप्टरमधील अंतराचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. एक हेलिकॉप्ट हेलिपॅडवरून उड्डाणाच्या तयारीत होतं. यावेळी दुसरं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर दाखल झालं.
दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या पायलटला दोन्ही हेलिकॉप्टरमधील अंतराचा अंदाज न आल्याने दुसरं हेलिकॉप्टर पहिल्या हेलिकॉप्टरच्या अगदी जवळ जातं. यावेळी पहिलं हेलिकॉप्टर उडण्याच्या तयारीत असल्याने त्याचे पंखे फिरत असतात. दुसरं हेलिकॉप्टर पहिल्या हेलिकॉप्टरच्या जवळ जाताच, दोन्ही हेलिकॉप्टरचे पंखे एकमेकांवर आदळतात आणि पाहतापाहता दोन्ही हेलिकॉप्टरचे तुकडे उडतात.
इतर संबंंधित बातम्या