दहावीला गणितात 36, इंग्रजीला 35, विज्ञानला 38, तरीही IAS झाले ! जिल्हाधिकाऱ्यांची व्हायरल मार्कशीट पाहिला का ?
परीक्षेतील वाईट निकालाने करिअरची सर्व दारे बंद होत नाहीत. याचे उदाहरण देताना गुजरातच्या भरूच जिल्ह्याचे कलेक्टर तुषार सुमेरा (Tushar Sumera) हे आहेत, ज्यांची कहाणी अनेकांसाठी खूप प्रेरणादायी ठरू शकते.
IAS Officer 10th Marksheet : सध्या अनेक राज्यांमध्ये बोर्डाचे निकाल जाहीर होत आहेत. यातील काही मुले आपल्या यशाची पताका फडकवत आहेत, तर काही अपयशाने निराश आहेत. हे दु:ख दूर करण्यासाठी काहींच्या मनात आत्महत्येसारखे वाईट विचारही येऊ लागतात, पण परीक्षेतील वाईट निकालाने करिअरची सर्व दारे बंद होत नाहीत. याचे उदाहरण देताना गुजरातच्या भरूच जिल्ह्याचे कलेक्टर तुषार सुमेरा हे आहेत, ज्यांची कहाणी अनेकांसाठी खूप प्रेरणादायी ठरू शकते.
इंटरनेटवर एका आयएएस अधिकाऱ्याचे ट्विट सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'भरूचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी त्यांची 10 वीची मार्कशीट शेअर करताना लिहिले आहे की, त्यांना दहावीमध्ये फक्त उत्तीर्ण गुण मिळाले आहेत. त्याच्या 100 पैकी इंग्रजीत 35, गणितात 36 आणि विज्ञानात 38 गुण मिळाले. संपूर्ण गावातच नाही तर त्या शाळेतही तो काहीच करू शकत नाहीत असे सांगण्यात आले.
दहावीच्या मार्कांवरून, भविष्यात तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी, हे अजिबात ठरवता येत नाही. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांच्या या ट्विटला भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी रिट्विट करत 'धन्यवाद सर' असे लिहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भरुचमध्ये उत्कर्ष पहल अभियानांतर्गत तुषार यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
भरूच के कलेक्टर तुषार सुमेरा ने अपनी दसवीं की मार्कशीट शेयर करते हुए लिखा है कि उन्हें दसवीं में सिर्फ पासिंग मार्क्स आए थे.
— Awanish Sharan (@AwanishSharan) June 11, 2022
उनके 100 में अंग्रेजी में 35, गणित में 36 और विज्ञान में 38 नंबर आए थे. ना सिर्फ पूरे गांव में बल्कि उस स्कूल में यह कहा गया कि यह कुछ नहीं कर सकते. pic.twitter.com/uzjKtcU02I
आयएएस अवनीश शरण यांच्या या ट्विटवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टला 12.5 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर 2200 हून अधिक लोकांनी या पोस्टला रिट्विट केलं आहे. एका युजरने म्हटले की, 'पदवी नाही, प्रतिभा महत्त्वाची असते.' त्याचवेळी, आणखी एका यूजरने लिहिले की, 'क्षमता मार्क, ग्रेड किंवा रँक ठरवत नाही.' दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, 'तुमच्यात चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही.'
Thank You Sir https://t.co/MFnZ7vSICz
— Tushar D. Sumera,IAS (@TusharSumeraIAS) June 11, 2022