(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trending Video : जंगली हॅमस्टरचं क्यूट फोटोशूट तुम्ही पाहिलं का? एकदा पाहाच हा गोंडस व्हिडीओ
Trending Video : जंगली हॅमस्टरचा एक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Trending Video : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) अनेकदा प्राण्यांच्या संदर्भातील व्हिडीओ सर्वात जास्त पाहिले जातात. या व्हिडीओला चाहत्यांची देखील विशेष पसंती मिळते. नुकताच जंगली हॅमस्टरचा (Wild Hamster) एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर लोकांना चांगलाच आवडला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेला हॅमस्टरचा हा व्हिडीओ प्रत्येकजण पसंत करत आहे. या व्हिडीओमध्ये आपण हॅमस्टरचे मजेदार पद्धतीने फोटो काढताना पाहू शकता. हॅमस्टरचा हा व्हिडिओ खूप गोंडस आहे. फोटोशूटमध्ये छोटा हॅमस्टर खूपच क्यूट दिसत आहे.
Have you ever seen a wild hamster doing a photoshoot? 😊
— Buitengebieden (@buitengebieden) July 22, 2022
🎥 @radwildlife pic.twitter.com/gzGZxbLhL6
हा हॅमस्टर खूप सुंदर आहे
या व्हिडिओमध्ये आपण जंगली हॅमस्टर पाहू शकता. फोटो घेत असलेल्या व्यक्तीने हॅमस्टरला व्यस्त ठेवण्याचा एक चांगला मार्ग देखील शोधला आहे. छायाचित्रकार हॅम्स्टरला एक फूल देतो आणि नंतर फोटो घेतो. या युक्तीमुळे हे फोटो अधिकच क्यूट आले आहेत. आणि हॅमस्टर देखील या फोटोला प्रतिसाद देताना दिसतोय.
व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर buitengebieden नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अल्पावधीतच लाखांनी लाईक्स मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :