Trending Video : सिग्नलवर कार साफ करणाऱ्या पोरांना फाईव्ह स्टार हॉटेलची सफर; व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल वा भाई वा!
Trending Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने या मुलांशी ज्या पद्धतीने वागणूक दिली आहे ती फार हृदयस्पर्शी आहे.
Trending Video : जेव्हा वाहने सिग्नलवर किंवा रस्त्याच्या कडेला थांबतात तेव्हा अनेकदा आपल्याला काही लहान मुलं हातात काही गोष्टी विकताना दिसतात, काम करताना दिसतात. आपल्याकडील वस्तू विकत घेण्यासाठी ही मुलं विनंती, विनवणी करतात. अनेक वेळा लोक त्यांना टोमणे मारतात किंवा अगदी कंटाळून त्यांच्या हातात दोन-चार-दहा रुपये देऊन पुढे निघून जातात. पण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये (Viral Video) एका व्यक्तीने या लहान मुलांना ज्या पद्धतीने वागणूक दिली आहे ते पाहून तुम्ही देखील हळवे व्हाल. या लहान मुलांना पैसे देण्याऐवजी त्या व्यक्तीने मुलांना त्यांच्या आयुष्यात कायम लक्षात राहील असा एक संस्मरणीय अनुभव दिला. या व्यक्तीने मुलांना 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन त्यांना उत्तम जेवणाचा आस्वाद दिला. मुलांनी आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेला त्यांच्या जीवनातील हा आनंद लुटला ज्याची आत्तापर्यंत ते फक्त कल्पना करू शकत होते. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल
हा व्हिडीओ इंटरनेटवर कमी कालावधीत तुफान व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर कंवल छाबरा नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या व्यक्तीने संपूर्ण माहितीही दिली आहे. काही मुलं या व्यक्तीच्या वाहनाभोवती उभी असल्याचे व्हिडीओत दिसतंय. ही लहान मुलं गाडी साफ करतायत. गाडीच्या आत बसलेली व्यक्ती त्या मुलांशी बोलतेय. या दरम्यान मुलं जेवणाबद्दल बोलतात. यानंतर ती व्यक्ती मुलांना कारमध्ये बसवून पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five Star Hotel) घेऊन जाते. आणि तिथे त्यांना उत्तम जेवणाचा आनंद लुटण्यास सांगते. मुलांसाठी हा फारच अविस्मरणीय अनुभव होता.
मुलांनी त्यांच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेतला
या पंचचारांकित हॉलेटमध्ये जाऊन ही मुलं त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे. सोशल मीडियावरही या व्हिडीओचे खूप कौतुक होताना दिसतंय. कंवलच्या मते, हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. आतापर्यंत या पोस्टला 43.3 दशलक्ष (4 कोटी) व्ह्यूज आणि 52 लाख लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून या व्यक्तीचं कौतुक देखील केलं आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या :