Trending News : माणसाला कुत्रा बनण्याची हौस भारी! कुत्र्याचं आयुष्य जगण्यासाठी लाखो रुपये केले खर्च
Trending News : छंद ही मोठी गोष्ट आहे. छंदामागे वेडे होऊन लोक अनेक आश्चर्यकारक गोष्टीही करतात.
Trending News : जगभरात प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल लोकं काय करतील याचा नेम नाही. काही माणसांसाठी छंद ही मोठी गोष्ट आहे. छंदामागे वेडे होऊन लोक अनेक आश्चर्यकारक गोष्टीही करतात. अशातच एका व्यक्तीने आपला छंद पूर्ण करण्यासाठी एक आश्चर्यकारक पाऊल उचलले आहे, जे पाहून सगळेच थक्क झाले. जपानमधील एका व्यक्तीने असा पराक्रम केलाय, ज्याची कल्पनाही करू शकत नाही, जाणून घ्या असं या व्यक्तीने काय केलं? ज्याची चर्चा सर्वत्र होतेय.
हा तर प्रत्यक्षात कुत्राच..! कुत्र्याचं आयुष्य जगण्यासाठी चक्क लाखो रुपये खर्च
जपानमध्ये हा विचित्र प्रकार समोर आला आहे. चक्क कुत्र्यासारखे दिसण्यासाठी एका व्यक्तीने 11 लाख रुपये खर्च केले, खरं तर, त्याला लहानपणापासून कुत्र्याचं आयुष्य जगायचं होतं. लाखो रुपये खर्च करून एका व्यक्तीने असा पोशाख बनवला आहे, जो परिधान करून तो कुत्र्यासारखा दिसतो. त्याचवेळी त्या व्यक्तीचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे पाहून एकदा असे वाटते की, प्रत्यक्षात कुत्राच समोर आहे. माणसाचा पोशाख एकदम खरा वाटतो. तुम्हीच पाहा...
View this post on Instagram
सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया
यासोबतच सोशल मीडियावर लोक यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच सोशल मीडिया यूजर्सही याचा भरपूर आनंद घेत आहेत.
हेही वाचा :