Viral Video : तुम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये गरबा पाहिलाय का? नवरात्रीत गरबा-दांडीयाची धूम! व्हिडीओ व्हायरल
Trending Viral Video : नवरात्रीतील गरबा-दांडियाचे विविध व्हिडीओ आपण सोशल मीडीयावर पाहिले असतील, पण तुम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये गरबा पाहिला आहे का?
Trending Viral Video : आज शारदीय नवरात्रीचा (Navratri 2022) पहिला दिवस, या निमित्ताने लोकांना गरबा-दांडियाही (Garba-Dandiya) दिसू लागतो, गरबा-दांडियाचे विविध व्हिडीओ आपण सोशल मीडीयावर (Social Media) पाहिले असतील, पण तुम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये गरबा पाहिला आहे का? हो, हे खरं आहे. स्विमिंग पूलमध्ये गरबा करताना महिला आणि पुरुषांचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्हीही एकदा पाहाच...
स्विमिंग पूलमध्ये गरबा होण्याची ही पहिलीच वेळ
व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून असे वाटते की, स्विमिंग पूलमध्ये गरबा होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. स्विमिंग पूलमध्ये गरबा करताना महिला आणि पुरुषांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही जण स्विमिंग पूलमध्ये गरबा करताना दिसत आहेत. याचा एक व्हिडीओ ANI च्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे, मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ राजस्थानच्या उदयपूर येथील आहे. जिथे स्विमिंग पूलमध्ये गरब्याचे आयोजन केले जाते.
#WATCH राजस्थान: उदयपुर में गरबा का आयोजन स्विमिंग पूल में किया गया। (23.09) pic.twitter.com/AIzqWi8rAL
— ANI_HindiNews (@AHindinews) September 23, 2022
व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही महिला पोहण्याचा पोशाख परिधान करून स्विमिंग पूलमध्ये 'चोगाडा थारा' या गाण्यावर गरबा करत आहेत. दरम्यान, राजस्थान आपल्या सुंदर संस्कृतीसाठी ओळखले जाते. राजस्थानची संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. स्विमिंग पूलमध्ये गरबा करतानाचा हा व्हिडीओ अगदी आवडीने पाहत आहेत आणि शेअर देखील करत आहेत, तसेच आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
गरबा डान्सचा अनोखा प्रयोग
नवरात्रीच्या काळात देशात ठिकठिकाणी सर्वत्र गरबा -दांडिया नृत्याचे आयोजन केले जाते. प्रत्येकजण आपला कार्यक्रम सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. तसाच हा अनोखा प्रयोग गरबा डान्समध्ये करण्यात आला असून यामध्ये सर्व स्पर्धक स्विमिंग पूलमध्ये गरबा करताना दिसत आहेत. ज्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Bride Video: लग्नापूर्वी नववधू पोहोचली जिममध्ये, सासरच्या मंडळींना सावध राहण्याचा इशारा? नेटकरी आश्चर्यचकित!
- Travel Without Visa : व्हिसाशिवाय 60 देशात भारतीयांना प्रवास करता येतो, कोणाच्याही परवानगीची गरज नाही