Travel Without Visa : व्हिसाशिवाय 60 देशात भारतीयांना प्रवास करता येतो, कोणाच्याही परवानगीची गरज नाही
How Many Countries visa on arrival : हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार भारतीय 60 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात.
India's Ranking In Henley Passport Index : कोरोना महामारीमुळे (Coronavirus) मागील दोन वर्षांत सर्वांच्या फिरण्यावर, सहलीवर अथवा परदेशवारीवर बंधनं आली होती. पण आता परिस्थिती बदलत असून लोक पुन्हा एकदा फिरायला जाऊ लागले आहेत. पुन्हा एकदा सुट्ट्याचं नियोजन करु लागले आहेत. भारतातही (India) फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण काहींना परदेशात फिरायला जायचं असते. पण कधीकधी व्हिसा न मिळाल्यामुळे विदेशात फिरायला जाणं कॅन्सल करावं लागते. पण असे काही देश आहेत, तिथं भारतीयांना व्हिसाशिवाय (Visa) फिरता येतं. आज आम्ही तुम्हाला अशा देशांची माहिती देत आहोत, जिथे भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो अथवा व्हिसा ऑन अराइव्हल ( visa on arrival ) मिळतो. पाहूयात कोणत्या देशात जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही... (Utility News In Marathi)
60 देशात व्हिसाशिवाय जाऊ शकता -
हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 च्या ( Henley Passport Index ) रिपोर्ट्सनुसार भारतीय लोक तब्बल 60 देशात व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022च्या क्रमवारीत भारत 87 व्या क्रमांकावर आहे. 2021 च्या तुलनेत भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. 2021 मध्ये भारत 90 व्या क्रमांकावर होता. हेनले पासपोर्ट इंडेक्स ( Henley Passport Index ) हा जागतिक पासपोर्ट रँकिंग चार्ट आहे, जो आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्राधिकरण (IATA) च्या डेटाचा वापर करून 199 पासपोर्टमध्ये 'सर्वात मजबूत' आणि 'कमकुवत' आहे. भारताच्या पासपोर्टबद्दल बोलायचे झाल्यास, 60 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करण्याची परवानगी देते.
कोणते देश आघाडीवर -
हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार जापानचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे. जपानच्या पासपोर्टवर जगभरातील 193 देशात व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. त्याशिवाय सिंगापूर आणि दक्षिण कोरियामधील नागरिकही या यादीत आहेत. जपाननंतर सिंगापूर आणि दक्षिण कोरिया संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या देशातील नागरिक 192 देशात व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात.
या देशात भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येतो -
जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. यामध्ये मालदीव, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, बोलिविया, मेडागास्कर, ट्युनीशिया, झिम्बाब्बे, तंजानिया, ब्रिटिश व्हर्जिन आयलँड, ईरान, ओमान, कतर, जॉर्डन, भूटान आणि इतर...
व्हिसामुक्त प्रवासाची भारताची क्रमवारी तितकीशी चांगली नाही. यामध्ये अनेक सुधारणा होण्याची गरज आहे. युरोपसह जगातील अनेक प्रमुख देशात प्रवास करण्यासाठी भारतीयांना व्हिसासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं.