Viral Video : मेट्रोमध्ये इन्स्टाग्राम Reel करणं पडणार महागात? एका महिलेवर होणार कारवाई, काय घडलं?
Viral Video : हैदराबाद मेट्रोमध्ये एका महिलेने एक इन्स्टाग्राम रील (Instagram Reel) बनवला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Trending Dance In Hyderabad Metro : सोशल मीडियाच्या (Social Media) या युगात व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात, हे रील्स बनवण्यासाठी काही रस्त्यावर, काही मॉलमध्ये, काही मेट्रो तर विमानामध्ये रील बनवताना दिसतात. हैदराबाद मेट्रोमध्ये एका महिलेने एक इन्स्टाग्राम रील (Instagram Reel) बनवला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कंटेट क्रिएटरने एक इंस्टाग्राम रील बनवली आणि ती हैदराबाद मेट्रोवर शुटींग करून सोशल मीडीयावर अपलोड केली. हा व्हिडीओ हजारो युजर्सनी पाहिला आणि लाईकही केला. या व्हिडिओवर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
Dance On Hyderabad Metro
— Hi Hyderabad (@HiHyderabad) July 20, 2022
When did this happen??? pic.twitter.com/ZilPdia9fx
यूजर्सकडून प्रश्न उपस्थित
हैदराबाद मेट्रोमध्ये बनवलेला हा डान्स व्हिडिओ काही युजर्सना आवडला, तर आणखी युजर्सनी या व्हिडीओचा निषेध केला आहे. मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीत असे व्हिडिओ बनवण्याची परवानगी कशी दिली जाते? असा सवाल युजर्सनी केला आहे.
ही कसली विडंबना??
आणखी एका यूजरने हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडला टॅग केले आणि ट्विट केले, "ही कसली विडंबना?? तुम्ही मेट्रो ट्रेनमध्ये याची परवानगी देता का? तुम्ही लोकांनी हैदराबाद मेट्रो स्थानकांना पिकनिक स्पॉट्स आणि डान्स फ्लोअर्समध्ये रूपांतरित केले आहे का?" हैदराबाद मेट्रोच्या आत रील बनवणाऱ्या या महिलेवर एचएमआरएल (HMRL-Hyderabad Metro Rail Limited) लवकरच कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या