एक्स्प्लोर

Titanic : पहिल्या प्रवासातच बुडालं टायटॅनिक! 'या' आलिशान जहाजासंबंधित आणखी काही रंजक बाबी जाणून घ्या...

Titanic Interesting Facts : टायटॅनिक जहाज अतिशय मोठं आणि आलिशान होतं. पहिल्याच प्रवासाला निघालेलं हे जहाज 1912 मध्ये बुडालं.

Titanic Sank on First Trip : टायटॅनिक जहाज (Titanic Ship) अतिशय मोठं आणि आलिशान होतं. पहिल्याच प्रवासाला निघालेलं हे जहाज बुडालं. ही जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी सागरी दुर्घटना आहे. टायटॅनिक जहाज दुर्घटना 1912 मध्ये घडली. 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासासाठी निघालं होतं. टायटॅनिक जहाज इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथून निघालेल्या न्यूयॉर्कपर्यंतच्या पहिल्या प्रवासासाठी निघालं होतं. 4 दिवसांच्या प्रवासानंतर, 15 एप्रिल रोजी मध्यरात्री ते एका हिमनगाला धडकले आणि त्याचे दोन तुकडे झाले. यामुळे टायटॅनिक जहाज अटलांटिक महासागरात बुडालं. अशा प्रकारे टायटॅनिक जहाजाचा पहिला प्रवासच त्याचा अखेरचा प्रवास ठरला. 

टायटॅनिक 'त्या' काळातील सर्वात मोठे जहाज

टायटॅनिक हे त्या काळातील सर्वात मोठे जहाज होतं. याला तरंगतं शहर असंही म्हटलं जात असे. टायटॅनिक जहात 882 फूट लांब आणि 46,000 टन वजनाचे होते. हे जहाज आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा नमुना होता. टायटॅनिक जहाजाला हिमनगाबाबतची चेतावणी पाणवण्यात आली होती. पण दुर्दैवाने कर्मचाऱ्यांनी या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. टायटॅनिकचा रेडिओ ऑपरेटर निष्काळजीपणे झोपी गेला होता.   

कधीही न बुडणार जहाज

या जहाजात अनेक वॉटरटाइट कंपार्टमेंट्स बांधण्यात आले होते. जहाजाची एक खोली पाण्याने भरली तरी दुसरी खोली पाण्याने भरणार नाही, यासाठी ही सुविधा करण्यात आली होती. हे जहाज तयार करताना विजेच्या तारा आणि पाण्याचे पाइप यासारख्या सर्व छोट्या-मोठ्या बाबी फार निरीक्षण आणि विचारविनिमय करुन ठरवण्यात आल्या होत्या. जरी जहाजात पाणी शिरलं तरी हे पाणी छताच्या उंचीपर्यंत पोहोचणार नाही, यासाठी छतावरही सुरक्षित कंपार्ट्मेंट्स बनवण्यात आले होते. त्यामुळेच हे जहाज कधीही बुडू शकत नाही, असं म्हटलं जात होतं. पण, हिमनगाला आदळून या जहाजाचा शेवट होईल, असा कुणी विचारही केला नव्हता.

आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेलं 'तरंगतं शहर'

टायटॅनिक जहाज पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेलं होतं. कधीही न बुडणारं जहाज असंही याला म्हटलं जात असे. पण, या कधीही न बुडणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाली. टायटॅनिक पूर्णपणे बुडायला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. यावेळी बचावकार्यही सुरू होते. विशेष म्हणजे यावेळी जहाजाच्या बँड सुरुच होता. जहाजावरील बँडचा नेता वॉलेस हार्टली याला संगीताची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी आपला कार्यक्रम सुरूच ठेवला होता.

...तर टाळता आली असती टायटॅनिक दुर्घटना

टायटॅनिक जहाजाला हिमनगाबाबतची चेतावणी पाणवण्यात आली होती. पण दुर्दैवाने कर्मचाऱ्यांनी या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. टायटॅनिकचा रेडिओ ऑपरेटर निष्काळजीपणे झोपी गेला होता. त्यामुळेच अपघात झाला तेव्हा तो प्रतिसाद देण्यासाठी वेळेवर उपलब्ध नव्हता. रेकॉर्डनुसार या अपघातात 1500 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 832 प्रवासी आणि 685 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 

1985 मध्ये सापडले टायटॅनिक जहाजाचे अवशेष

टायटॅनिक जहाज दुर्घटना 1912 साली घडली. पहिल्या प्रवासावर निघालेल्या टायटॅनिक जहाजाला अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली. यानंतर तब्बल 73 वर्षांना या जहाजाचे अवशेष सापडले. टायटॅनिक जहाजाचे अवशेष 1985 मध्ये सापडले होते. हे समुद्र तळाशी 15 स्क्वेअर मैल परिसरात पसरलेले आहेत. 1985 साली रॉब बॅलाड आणि त्यांच्या टीमने पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Embed widget