एक्स्प्लोर

Titanic : 27 वर्षांपूर्वीच सापडलेले टायटॅनिकचे अवशेष, अजूनही समुद्राबाहेर का काढले गेले नाही? 'टायटॅनिक'चा इतिहास काय जाणून घ्या...

Titanic Interesting Facts : 15 एप्रिल 1912 साली टायटॅनिक जहाज हिमनगाला आदळून अटलांटिक महासागरात बुडालं. या जहाजाचे दोन तुकडे झाले जे सुमारे 4000 खोल समुद्राच्या तळाशी गेले.

Missing Titan Submarine : टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीचा अपघात होऊन त्यातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांजवळच या बेपत्ता असलेल्या टायटन पाणबुडीचे अवशेष सापडल्याची माहिती, अमेरिकन तटरक्षक दलाने दिली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय जहाजाच्या अपघाताला 100 हून अधिक वर्ष उलटून गेली आहे. या जहाजाचे अवशेष आजही अटलांटिक समुद्राच्या तळाशी आहेत.

टायटॅनिक बुडून 110 वर्षांहून अधिक काळ लोटला

15 एप्रिल 1912 साली टायटॅनिक जहाज हिमनगाला आदळून अटलांटिक महासागरात बुडालं. यामध्ये हजारो प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या जहाजाचे दोन तुकडे झाले, जे सुमारे 4000 खोल समुद्राच्या तळाशी गेले. जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय जहाज टायटॅनिक बुडून 110 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याचे अवशेष 1985 मध्ये सापडले होते. या जहाजाचे अवशेष सापडले असताना ते आजपर्यंत समुद्राबाहेर का काढले गेले नाही, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण जाणून घ्या...

कधीही न बुडणारं जहाज

जगातील सर्वात लोकप्रिय टायटॅनिज जहाजाचं नाव तुम्ही ऐकलच असेल. कधीही न बुडणारं अशी या जहाजाची ओळख होती मात्र, जे घडलं ते साऱ्यांनाच माहित आहे. टायटॅनिक जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासावेळी अपघातग्रस्त झालं.

कुधी बुडालं टायटॅनिक जहाज?

टायटॅनिक जहाजने 10 एप्रिल 1912 रोजी ब्रिटनमधील साउथॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्कपर्यंतचा पहिला प्रवास सुरू केला. अवघ्या 4 दिवसांनंतर म्हणजेच 15 एप्रिल रोजी उत्तर अटलांटिक महासागरातील एका हिमनगाशी टक्कर होऊन या जहाजाचा अपघात झाला. या जोरदार धडकेत जहाजाचे दोन तुकडे झाले आणि जे सुमारे 4 किलोमीटर खोलीवर समुद्रात बुडाले.

1500 लोकांचा मृत्यू

टायटॅनिक जहाज दुर्घटनेत हजारो जणांना जीव गमवावा लागला. जहाजावरील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांसह सुमारे 1500 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. टायटॅनिक जहाज दुर्घटना इतिहासातील सर्वात मोठी सागरी दुर्घटना आहे. जवळजवळ 70 वर्षे, टायटॅनिकचे अवशेष समुद्राच्या 4 किमी खाली होते. 1985 साली रॉब बॅलाड आणि त्यांच्या टीमने पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधले.

टायटॅनिकचे अवशेष समुद्राच्या बाहेर का नाही काढले?

टायटॅनिक जहाजाचे अवशेष बाहेर काढण्याचं काम फार अवघड आहे. सुमारे 4 किलोमीटर खोलीवर समुद्रात हे जहाजाचे अवशेष आहेत. हे जहाज जिथे बुडाले तिथे सगळीकडे फक्त अंधारच. समुद्राच्या खोलीतील तापमानही 1 अंश सेल्सिअस असते. या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना, एखाद्या व्यक्तीने इतके खोलवर जाणं आणि नंतर परत येणं हे खूप धोकादायक आहे. अशा परिस्थितीत खोल समुद्रातून ढिगारा बाहेर काढणं खूप कठीण आहे. प्रतिकूल परिस्थितीत समुद्राच्या खोलवर 4 किलोमीटर खाली पडलेला ढिगारा बाहेर काढणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळेच हा ढिगारा अद्याप समुद्राच्या तळाशी आहे.

20-30 वर्षे टिकतील अवशेष

तज्ज्ञांच्या मते, टायटॅनिकचे अवशेष आता समुद्रात वेगाने नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बाहेर काढूनही उपयोग होणार नाही. येत्या 20 ते 30 वर्षात टायटॅनिकचा अवशेष पूर्णपणे वितळून जातील. काही वर्षांनी हे अवशेष समुद्राच्या पाण्यात विरघळतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. समुद्रात आढळणारे जिवाणू टायटॅनिकचे लोखंड झपाट्याने खात आहेत, त्यामुळे ते वेगाने गंजत आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सागरी जीवाणू दररोज सुमारे 180 किलो कचरा खातात. अशा परिस्थितीत टायटॅनिक जहाजाचे अवशेष फार काळ शिल्लक राहणार नाही, त्यामुळे टायटॅनिकचा ढिगारा बाहेर काढणं फायदेशीर ठरणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget