Success Story: भावाकडून 5000 उधार; व्यवसाय सुरु केला, पण सतत अपयश अन् आज 14,000 कोटींच्या कंपनीचे मालक
M. P. Ramachandran: भारतात असे अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी अगदी शून्यापासून आपली कारकीर्द सुरू केली आणि आज अगदी यशाच्या शिखरावर आहेत. अशाच एका व्यक्तीबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Success Story: 'आया नया उजाला, चार बूंदों वाला'… 90 च्या दशकातील जाहिरातीची (Advertise) ही ओळ तुम्ही ऐकली असेल. कपड्यांच्या शुभ्रतेसाठी लोक अनेक वर्षांपासून उजाला (Ujala) नीळ वापरत आले. पण, उजाला नीळ आणि त्या कंपनीच्या मालकाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? एम. पी. रामचंद्रन (M. P. Ramachandran) यांची कारकीर्द जाणून घेतल्यावर कदाचित तुम्हालाही आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा मिळेल.
उजाला ब्लूची निर्मिती करणाऱ्या ज्योती लॅबोरेटरीज लिमिटेडचे संस्थापक एम. पी. रामचंद्रन (M. P. Ramachandran) हे लाखो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणा बनले आहेत. उजालाच्या यशामागे रामचंद्रन यांची अविरत मेहनत आहे. ज्योती लॅबोरेटरीजची दोन महत्त्वाची उत्पादनं 'उजाला लिक्विड क्लॉथ व्हाईटनर' आणि 'मॅक्सो मॉस्किटो रिपेलेंट्स' देशात खूप प्रसिद्ध झाली आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 13,583 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक एम. पी. रामचंद्रन यांनी एकदा 5000 रुपयांचं कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला होता.
5000 रुपयांच्या कर्जातून उभं केलं 14000 कोटी रुपयांचं साम्राज्य
एम. पी. रामचंद्रन यांनी आपल्या भावाकडून 5 हजार रुपये उसने घेऊन या रकमेतून तात्पुरता व्यवसाय सुरू केला होता. पण, त्यांची अथक मेहनत आणि परिश्रमामुळे आज एक मल्टी ब्रँड कंपनी तयार झाली. त्यांची ज्योती लॅबोरेटरीज ही आज 13,583 कोटी रुपयांची कंपनी आहे.
एम. पी. रामचंद्रन रामचंद्रन यांनी पोस्ट ग्रॅज्युएशननंतर अकाऊंटंट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांना नेहमी शिकण्याची इच्छा असायची आणि त्यांच्याकडे आउट ऑफ द बॉक्स विचार असायचे. या कारणास्तव त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि हे कायम ठेवून त्यांनी काही वेगळी उत्पादनं (Products) तयार केली.
व्हाईटनर बनवण्यासाठी केले अनेक प्रयोग
कपड्यांसाठी व्हाईटनर बनवण्यासाठी त्यांनी स्वयंपाकघरात प्रयोग सुरू केले, पण त्यात यश आलं नाही. एके दिवशी त्यांना रासायनिक उद्योगाचं मासिक दिसलं. ज्यात असं म्हटलं होतं की, जांभळ्या रंगांचा वापर कपड्यांना पांढरे-शुभ्र आणि चमकदार बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. यानंतर रामचंद्रन यांनी वर्षभर जांभळ्या रंगांचे प्रयोग सुरू ठेवले.
कौटुंबिक जमिनीवर सुरू केला छोटा कारखाना
रामचंद्रन यांनी 1983 मध्ये केरळमधील त्रिशूर येथे कौटुंबिक जमिनीच्या एका छोट्या भागावर तात्पुरता कारखाना सुरू केला. त्यासाठी त्यांनी भावाकडून 5 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यांनी त्यांची मुलगी ज्योती हिच्या नावावरुन कंपनीचं नाव ज्योती लॅबोरेटरीज ठेवलं. उजळ आणि पांढर्या कपड्यांच्या ग्राहकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून त्यांनी उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर तयार केलं.
सुरुवातीला 6 महिलांच्या गटाने घरोघरी विकलं उत्पादन
उजाला सुप्रीमने अगदी छोट्या कालावधीत घराघरात लोकप्रियता मिळवली. ज्योती लॅबोरेटरीजची बाजारपेठ सुरुवातीला दक्षिण भारतात वाढली आणि 1997 पर्यंत हे उत्पादन देशभर प्रसिद्ध झालं. आज, उजालाचा राष्ट्रीय स्तरावर लिक्विड फॅब्रिक क्षेत्रात मोठा वाटा आहे.
हेही वाचा:
Success Story : इस्त्रायला गेला, तंत्रज्ञान शिकून आला; आज कमावतोय लाखोंचा नफा